"आईने मला 4 लाखांना विकलं, मला तिच्यापासून वाचवा..."; मुलीने पोलिसांकडे मागितली मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 12:01 PM2023-12-08T12:01:34+5:302023-12-08T12:05:34+5:30
आईने मुलीला हरियाणातील एका व्यक्तीला चार लाख रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एका 18 वर्षीय मुलीने तिच्या आईवर गंभीर आरोप केला आहे. आईने मुलीला हरियाणातील एका व्यक्तीला चार लाख रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, ही मुलगी गोरखपूरमधील महेसरा येथील रहिवासी आहे. ज्या व्यक्तीसोबत माझे लग्न झाले, त्याने मला मारहाण केली आणि चुकीचं काम करण्यास भाग पाडलं असं मुलीने म्हटलं आहे.
पोलीस अधीक्षक (गोरखपूर उत्तर विभाग) मनोज अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने बुधवारी आमच्याशी संपर्क साधला आणि दावा केला की ती चिलुताल पोलीस स्टेशन क्षेत्रातील महेसरा भागातील रहिवासी आहे आणि तिला हरियाणातील एका व्यक्तीला विकण्यात आलं आणि त्याच्यासोबत लग्न लावण्यात आलं. त्याने आपल्या तक्रारीत तिच्या आईने 23 नोव्हेंबर रोजी तिच्या घरी झालेल्या एका विवाह सोहळ्यात हरियाणाच्या एका व्यक्तीकडून 4 लाख रुपये घेतले आणि लग्न लावल्याचं सांगितलं.
चिलुआतल पोलीस स्टेशनचे एसएचओ संजय मिश्रा म्हणाले की, आरोपांचा तपास सुरू आहे. मुलीच्या दोन मोठ्या बहिणींचेही हरियाणात लग्न झाले आहे. तिची आई आणि इतर कुटुंबीयांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र, आम्ही त्याचे सर्व पैलू तपासत आहोत. तिच्या आईशिवाय, मुलीने तिच्या एका मित्रावर चुकीच्या कामात अडकवल्याचा आरोप केला आहे.
माझ्या घराशेजारी राहणारी महिला हरियाणातील गरीब कुटुंबातील मुलींचे लग्न लावते. ती माझ्या आईचीही मैत्रीण आहे. माझ्या सहा बहिणींपैकी दोन बहिणी विवाहित आहेत. काही दिवसांपूर्वी तिच्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून आईने माझे लग्न हरियाणातील एका तरुणाशी चार लाख रुपये घेऊन करून दिले. पण तिथे गेल्यावर कळलं की माझं लग्न झालं नसून मला विकलं गेलं आहे. मला वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिथून पळून जाण्यात मी यशस्वी झाले असं मुलीने सांगितलं.