धक्कादायक! 10 वर्षांत विश्वास जिंकला अन् नंतर 'तिने' 10 लाखांच्या दागिन्यांवरच डल्ला मारला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 02:03 PM2024-03-15T14:03:39+5:302024-03-15T14:04:39+5:30

मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या कविताने जवळपास 10 वर्षे एका घरात काम केलं. कुटुंबीयांचा विश्वास जिंकला. आता तब्बल 10 लाखांचे दागिने पाहिल्यावर तिने त्यावर डल्ला मारला.

gorakhpur maid along with her friend stole jewelery worth rs 10 lakh | धक्कादायक! 10 वर्षांत विश्वास जिंकला अन् नंतर 'तिने' 10 लाखांच्या दागिन्यांवरच डल्ला मारला

धक्कादायक! 10 वर्षांत विश्वास जिंकला अन् नंतर 'तिने' 10 लाखांच्या दागिन्यांवरच डल्ला मारला

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या कविताने जवळपास 10 वर्षे एका घरात काम केलं. कुटुंबीयांचा विश्वास जिंकला. आता तब्बल 10 लाखांचे दागिने पाहिल्यावर तिने त्यावर डल्ला मारला. कविताने तिच्या दोन साथीदारांसह दागिने लंपास केले आहेत. रामगढतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणीबाग येथे ही धक्कादायक घटना घडली असून घरात चोरी झाल्याचं उघडकीस आलं आहे.

ज्या घरात ही घटना घडली त्या घरात काम करणारी मोलकरीण आणि तिच्या दोन साथीदारांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही चोरीची घटना उघडकीस आणण्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपी आणि तिचा साथीदार चंदन वर्मा यांना अटक केली आहे. चोरीचा माल विकण्यासाठी तो कविताला मदत करत होता.

11 मार्च रोजी रामगढताल येथील एका घरात दागिने चोरीला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या चोरीची मुख्य सूत्रधार दुसरी कोणी नसून घरातील मोलकरीण असल्याचं समोर आले आहे. एसएसपी डॉ. गौरव ग्रोवर यांनी सांगितलं की, राणीबाग मौरापुरम कॉलनीत राहणारी कविता मोलकरीण म्हणून काम करते.

घटना घडलेल्या घरात ती गेली 10 वर्षे काम करत होती. दरम्यान, तिची अमनशी मैत्री झाली. त्यामुळे घरात सोन्याचे दागिने कोठे ठेवले आहेत, याची माहिती महिलेला होती. याचा फायदा घेत त्याने मित्रासोबत 11 मार्च रोजी चोरी केली. छतावरून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून कविता साथीदारांसह तेथून पळून गेली होती.

चोरीचे सर्व दागिने जप्त करण्यात आल्याचं एसएसपी म्हणाले. यामध्ये दोन सोन्याचे नेकलेस, सोन्याची चेन आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे. घरात नोकर किंवा मोलकरीण ठेवण्यापूर्वी पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच सतर्क राहा असं देखील म्हटलं आहे. 
 

Web Title: gorakhpur maid along with her friend stole jewelery worth rs 10 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.