GOT MARRIED: असहाय्य बापाने पोलिसांत मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदविली; तिने सोशल मिडीयावर सत्य सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 11:27 AM2022-01-30T11:27:58+5:302022-01-30T11:28:16+5:30
Bihar Crime News: एक व्हि़डीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणी तिच्या अपहरणाची तक्रार खोटी असल्याचे सांगत आहे.
बिहारच्या हाजीपूरमध्ये एक व्हि़डीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणी तिच्या अपहरणाची तक्रार खोटी असल्याचे सांगत आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी आपल्याला मदत करावी अशी मागणी करत आहे. तरुणीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
हा व्हायरल झालेला व्हिडीओ गोरौल पोलिस स्टेशनच्या मलिकपुरा येथील रहिवासी तरुणीचा आहे. FIR दाखल झाल्यानंतर तरुणीने आपल्या फेसबुक अकाऊंटवर आपण लग्न केल्याचा पहिली पोस्ट केली. यानंतर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करून ती अल्पवयीन नसल्याचे सांगितले. तसेच वडिलांवर त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. तरुणीने आपले अपहरण झालेले नाही, यामुळे पोलिसांनी आपल्याला मदत करावी अशी विनंती केली आहे.
सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये मुलगी एका मुलासोबत दिसत आहे. मुलगी म्हणतेय की, तिने स्वतःच्या इच्छेने मुलाशी लग्न केले आहे आणि ती आनंदी आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुलगी आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न केल्याचे सांगून तिला त्रास देऊ नये, अशी विनंती कुटुंबीयांना करताना दिसत आहे.
एफआयआर आणि त्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून हे प्रकरण प्रेमप्रकरण आणि त्याच्याशी संबंधित वादाचे असल्याचे दिसते. सध्या पोलिसांसोबत अपहरणाचा गुन्हा आणि एफआयआर झाल्यानंतर हा व्हायरल व्हिडिओ आहे. व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर मुलगीही बेपत्ता आहे. आता या मुलीला पोलीस मदत करतात की त्या मुलावर कारवाई होते, हे पोलिसांच्या कारवाईनंतरच स्पष्ट होणार आहे.