हॅकर्सच्या निशाण्यावर आता सरकारी संस्था; केंद्राच्या अहवालातून माहिती समोर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 06:58 AM2021-12-15T06:58:54+5:302021-12-15T06:59:12+5:30

Cyber Attacks : यावर्षी ऑक्टोबरपर्यंत ३० हजारांवर सायबर हल्ले.

Government agencies now target hackers; In front of the information from the report of the center | हॅकर्सच्या निशाण्यावर आता सरकारी संस्था; केंद्राच्या अहवालातून माहिती समोर 

हॅकर्सच्या निशाण्यावर आता सरकारी संस्था; केंद्राच्या अहवालातून माहिती समोर 

Next

नवी दिल्ली : देशात कोणाचेही सोशल मीडिया अकाउंट सेफ नसल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच हॅकर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट हॅक केले होते. अधिकृतपणे बिटकॉइनला कायदेशीर मान्यता देण्याचे ट्वीटही यावेळी करण्यात आले होते. 

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, यावर्षी ऑक्टोबरपर्यंत सरकारी संस्थांवर ३० हजारांपेक्षा अधिक सायबर हल्ले झाले आहेत. २०२० मध्ये सरकारी संस्थांवर ५० हजारांपेक्षा अधिक सायबर हल्ले झाले होते. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली होती. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, इंडियन कॉम्युटर इमर्जेन्सी रिस्पॉन्स टीम भारतात सायबर सुरक्षेच्या घटनांना ट्रॅक आणि मॉनिटर करत आहे. २०२० आणि २०२१ च्या दरम्यान एकूण ११,५८,२०८ आणि १२,१३,७८४ सायबरशी संबंधित घटना झाल्या आहेत. यातील २०२० आणि २०२१ च्या दरम्यान एकूण ५४,३१४ आणि ३२,७३६ घटना सरकारी संघटनांशी संबंधित होत्या. 

स्ट्राँग पासवर्ड बनवा, अपडेट करत राहावे
ट्रू फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन ठेवा, वेगवेगळे ई-मेल आयडी बनवा, फिशिंग लिंकवर क्लिक करू नका, रिमेंबर पासवर्डचा वापर नको, सगळ्या खात्यांचा पासवर्ड वेगळा असावा, ब्राऊजर हिस्ट्री डिलीट करा, अँटी व्हायरस प्रोग्रॅमचा वापर करा, पब्लिक वाय-फायचा वापर करू नये, सायबर कॅफेवर लाॅगईन करू नका आणि अकाऊंट लॉग आऊट असावे.

Web Title: Government agencies now target hackers; In front of the information from the report of the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.