बापरे! हजारोंच्या उपस्थितीत गव्हर्नरची सुरू होती ऑनलाईन मिटिंग; अचानक लागला पॉर्न व्हिडीओ, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 12:30 PM2021-05-24T12:30:22+5:302021-05-24T12:53:06+5:30
अर्जेटिनामध्ये एका नेत्याला शरमेने मान खाली घालावी लागली जेव्हा त्याच्या झूम स्क्रीनला कोणीतरी हॅक केलं आणि त्यावर पॉर्न क्लिप सुरू झाली.
संपूर्ण जग सध्या कोरोना महामारीच्या विळख्यात सापडलं आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन असल्याने लोकांनी ऑनलाईन माध्यमांचा वापर वाढवला आहे. कोरोनाच्या या काळात इंटरनेटचा वापर वाढला असून ऑनलाईन मिटिंगसाठी सध्या झूमचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. अशावेळी इंटरनेटवर मिटिंग सुरू असताना अश्लिल व्हिडीओ सुरू झाल्याच्या बातम्या आपण वाचल्याच असतील. असाच एक प्रकार राजकीय नेत्याच्या बाबतीत घडला आहे.
अर्जेटिनामध्ये एका नेत्याला शरमेने मान खाली घालावी लागली जेव्हा त्याच्या झूम स्क्रीनला कोणीतरी हॅक केलं आणि त्यावर पॉर्न क्लिप सुरू झाली. गुस्तावो बोर्डेट नावाच्या या नेत्याने झूमवरून एका ऑनलाईन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यांच्या या कार्यक्रमाला अनेक नेते सहभागी झाले होते त्यासोबत सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश होता. गुस्तावो मध्य अर्जेटिनाच्या प्रांतातील एंट्र रॉयसचे गव्हर्नर आहेत.
गुस्तावो यांच्या ऑनलाईन मिटिंगमध्ये हजारापेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचं आयोजन अर्जेटिनाच्या सत्ताधारी पार्टीच्या यूवा कार्यकर्त्यांनी केलं होतं. या इव्हेंटचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जेव्हा या बैठकीत पॉर्न व्हिडीओची क्लीप सुरु होती. प्रशासनाकडून हा व्हिडीओ हटवण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत कोणालाही अटक केली नाही. पण ट्विटरवर एक ग्राफीक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एंट्रे रॉयसच्या राज्यपालांना पाहता येते. त्यासोबत बॅकग्राऊंडला पॉर्नक्लिप दाखवली जात आहे.
कोरोना महामारी संकटातील राजकीय आव्हान या विषयावर या ऑनलाईन बैठकीत चर्चा होणार होती. त्यावेळी पॉर्न व्हिडीओ चालवण्यात आला. कोरोना महामारीमुळे जगभरात झूम मिटिंग संस्कृती वाढली आहे. त्यामुळे हॅकर्सही सक्रीय झालेत. याआधी साऊथ आफ्रिकेत एका संसदीय अधिवेशनावेळी, ब्रिटीश फुटबॉल क्लबच्या बैठकीत अशा घटना घडल्या आहेत. जेव्हा मिटिंग हॅक करून पॉर्न व्हिडीओ क्लिप सुरू झाल्याची बातमी समोर आली होती. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या एका टिनेजरवर आरोप लावला होता की, त्याने बराक ओबामा, किम कार्दशियांसारख्या अनेक जागतिक सेलेब्रिटीचे ट्विटर हँडल हॅक केले होते. कोरोना महामारीच्या काळात टीनेजरवर ऑनलाईन केस सुरू होती तेव्हा यांचे ट्विटर अकाऊंट हॅक केले होते. केसच्या सुनावणीवेळी हँकर्सने पॉर्न व्हिडीओ सुरू केले होते.