जि.प. शाळेत आढळला अज्ञात मुलाचा मृतदेह
By दादाराव गायकवाड | Updated: November 10, 2022 20:03 IST2022-11-10T20:03:15+5:302022-11-10T20:03:55+5:30
रिसोड तालुक्यातील रिठद येथील घटना, ओळख पटवण्याचे आव्हान

जि.प. शाळेत आढळला अज्ञात मुलाचा मृतदेह
दादाराव गायकवाड / वाशिम: रिसोड तालुक्यातील रिठद जि.प. शाळेतील वरच्या मजल्यावर शौचालयाच्या बाजूला अज्ञात मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला असल्याची घटना १० नोव्हेंबरला दुपारच्या तुम्हाला सुमारास उघडतीस आली.
शाळेला दिवाळीच्या खूप दिवसापासून सुट्टी होत्या गुरुवार १० नाेव्हेंबरला शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी सर्व खोल्या साफ करता करता वरच्या मजल्यावर दुर्गंधीचा वास येत होता. त्या दुर्गंधीकडे शिक्षक व विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन पाहणी केली असता तेथे अंदाजे दहा ते बारा वर्षाच्या मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी गावचे पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामीण पोलीस स्टेशनला याबाबत सूचना दिली.
त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने ओळख पटू शकली नाही. त्यामुळे मृतक मुलगा कोण, त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. नेमका या मुलाचा मृत्यू कसा झाला आणि कधी झाला, याबाबत आता वाशिम ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.