अल्पवयीन मुलीच्या केसाला पकडून फरफटत नेले; मांत्रिकाची भूत पळवत असल्याची बतावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 06:46 PM2022-06-27T18:46:50+5:302022-06-27T18:52:52+5:30

Ghost fair lack magic : हवनकुंड जाळून भूतबाधा पळवून लावण्याच्या नावाखाली तांत्रिक विचित्र कृत्ये करत आहेत. यासोबतच ते गावकऱ्यांकडून पैसेही हडप करत आहेत.

Grabbed the minor girl's hair and led her around; Pretending to be possessed by a witch | अल्पवयीन मुलीच्या केसाला पकडून फरफटत नेले; मांत्रिकाची भूत पळवत असल्याची बतावणी

अल्पवयीन मुलीच्या केसाला पकडून फरफटत नेले; मांत्रिकाची भूत पळवत असल्याची बतावणी

Next

एकविसाव्या शतकातही तंत्र-मंत्राच्या माध्यमातून भूतबाधा पळवण्याचा ढोंगीपणा भारतात अजूनही सुरू आहे. आजही लोक अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकून आपल्या समस्या सोडवण्यासाठी तांत्रिकांपर्यंत पोहोचतात. बिहारच्या समस्तीपूरमध्ये 'भूत' पळवण्याचा मेळा भरतो, जिथे मोठ्या संख्येने गावकरी आपल्या अल्पवयीन मुलींसह तांत्रिकांपर्यंत पोहोचत आहेत. हवनकुंड जाळून भूतबाधा पळवून लावण्याच्या नावाखाली तांत्रिक विचित्र कृत्ये करत आहेत. यासोबतच ते गावकऱ्यांकडून पैसेही हडप करत आहेत.


रोसडा येथील शंकरपूर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये या मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भूत-बाधाच्या नावाखाली तांत्रिक अल्पवयीन मुलीचे केस ओढून फरफडत नेत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. यासोबतच तंत्र-मंत्र करून रोग बरा करण्याची बतावणी तांत्रिक करत आहेत. यावेळी अनेकजण उपस्थित होते, जे प्रेक्षक बनून हा सर्व प्रकार पाहत आहेत.

समस्तीपूरमध्ये भूतविद्या मेळा भरला
दरवर्षी येथे भूतबाधा पळवण्याचा मेळा भरत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. तांत्रिकांकडे लोक दुरून आपल्या समस्या घेऊन येतात. मात्र, अशा अंधश्रद्धेपासून दूर राहण्यासाठी प्रशासनाकडून लोकांना वेळोवेळी समजावून सांगितले जाते. मात्र तांत्रिकांकडे गेल्याने त्यांच्या कुटुंबावर आणि मुलांवर भूताची सावली कधीच पडणार नाही, असा ग्रामस्थांचा अंध विश्वास आहे. 

 

समस्तीपुर में लगा भूत भगाने का मेला

Web Title: Grabbed the minor girl's hair and led her around; Pretending to be possessed by a witch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.