नातवाकडून आजोबाला काठीने मारहाण, काकावरही हल्ला, गुन्हा दाखल 

By अनिल गवई | Published: July 17, 2023 12:57 PM2023-07-17T12:57:11+5:302023-07-17T12:57:24+5:30

याप्रकरणी पोलीस तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून पिंपळगाव राजा पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

Grandfather was beaten with a stick by grandson, uncle was also attacked, case registered, khamgoan | नातवाकडून आजोबाला काठीने मारहाण, काकावरही हल्ला, गुन्हा दाखल 

नातवाकडून आजोबाला काठीने मारहाण, काकावरही हल्ला, गुन्हा दाखल 

googlenewsNext

खामगाव: घरगुती वादातून नातवाने आजोबाला मारहाण करून जखमी केले. यावेळी भांडण आवरण्यास गेलेल्या काकावरही तलवारीने हल्ला करण्यात आला. ही घटना खामगाव तालुक्यातील ढोरपगाव येथे रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलीस तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून पिंपळगाव राजा पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

याबाबत पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार, ढोरपगाव येथील विक्की सहदेव धुरंधर (वय २४) हा त्याचे आजोबा महादेव धुरंदर यांना काठीने मारहाण करत होता. त्यानंतर दोघांचा भांडणाचा आवाज आल्याने विक्कीचे काका युवराज धुरंधर त्याठिकाणी पोहोचले. यावेळी मारहाणीबाबत विचारले असता, आरोपीने तक्रारकर्ते युवराज धुरंधर यांना अशि्लल शिविगाळ करून तलवारीने उजव्या मनगटावर तलवार मारून जखमी केले. 

दरम्यान, विक्कीच्या आजोबाला मारहाण करून जखमी केल्याचा आरोप पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला आहे. या तक्रारीवरून तसेच वैद्यकीय अहवालावरून पिंपळगाव राजा पोलीसांनी आरोपी विक्की धुरंधर विरोधात भादंवि कलम ३२४, ३२६, ५०४ सहकलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पिंपळगाव राजा पोलीस करीत आहेत.

Web Title: Grandfather was beaten with a stick by grandson, uncle was also attacked, case registered, khamgoan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.