धक्कादायक! ...म्हणून १६ वर्षीय नातवाने आजीची केली हत्या, मालिका पाहून बनवला हत्येचा प्लॅन!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 12:53 PM2021-04-14T12:53:51+5:302021-04-14T13:00:18+5:30
आरोपीचे वडील म्हणाले की, १२ एप्रिलला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे ते पत्नीला घेऊन दुपारी हरयाणाला खरेदीसाठी गेले होते.
पंजाबच्या होशियारपूरमध्ये एका नातवाने आपल्या ८५ वर्षीय आजीची हत्या करून तिचा मृतदेह जाळला. हा सगळा प्लॅन त्याने मालिका बघून केला होता. पण केवळ १० तासात पोलिसांनी ही केस सॉल्व केली आणि अल्पवयीन आरोपीला अटक केली. पोलिसांनी खुलासा केला की, १६ वर्षाच्या नातवाने मालिका बघून हे कृत्य केलं. अल्पवयीन आरोपीने हे खळबळजनक कृत्य तेव्हा केलं जेव्हा तो घरात आजीसोबत एकटाच होता. त्याचे आई-वडील खरेदी कऱण्यासाठी बाजारात गेले होते. मुलाच्या वडिलाने सांगितले की, साधारण साडे तीन महिन्यांपासून आईच्या एका पायाची हाड मोडलं आहे. त्यामुळे ती हलू शकत नाही. बेडवरच पडलेली असते.
आरोपीचे वडील म्हणाले की, १२ एप्रिलला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे ते पत्नीला घेऊन दुपारी हरयाणाला खरेदीसाठी गेले होते. जेव्हा ते परत येत होते तेव्हा रस्त्यात त्यांना मुलाचा फोन आला. त्याने सांगितले की, लवकर घरी या, काही लोकांनी आपल्या घरावर हल्ला केला आहे. जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा मेन गेट बंद होतं. ते लहान दरवाज्यातून घरात शिरले. त्यांना पाहिलं की, आईच्या रूममध्ये आणि बेडवर आग लागली आहे. दुसऱ्या रूममध्ये मुलगा बेडवर पडला आहे. त्याचे हात-पाय बांधले आहेत. (हे पण वाचा : खळबळजनक! पतीने केलं दुसरं लग्न म्हणून पत्नीने महिलेसोबतच थाटला संसार, आता मुलांचा बळी देण्याचा प्लॅन!)
त्यांनी नंतर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. सोबतच शेजाऱ्यांची चौकशी केली. आऱोपीने पोलिसांना सांगितले की, चार लोक पायऱ्यांवरून घरात दाखल झाले होते आणि त्याचे हात-पाय बांधून त्याला बेडवर फेकलं. नंतर त्यांनी आजीच्या रूममध्ये जाऊन बेडला आग लावली. सोबतच आरोपीने पोलिसांना हेही सांगितले की, त्या लोकांनी धमकी दिली होती की, तुझ्या वडिलांना सांग की, केस मागे घ्या. नाही तर पूर्ण परिवाराला मारलं जाईल. आगीत आरोपीच्या आजीचं शरीर पूर्ण जळालं. तिच्या डोक्यावर जखमेचे निशाणही होते.
याप्रकरणी एसपी रवींद्र पाल सिंह यांनी सांगितले की, डीएसपी गुरप्रीत सिंह आणि हरयाणाचे इन्स्पेक्टर हरगुरदेव सिंह यांनी एक टीम बनवली. टीमने कसून चौकशी केली. त्यानंतर संशयाच्या आधारावर आजीच्या नातवाची चौकशी केली. त्यातून समोर आलं की, त्याने ठरवून आजीची हत्या केली.
आरोपीने सांगितले की, आजीने रागावल्याने तो हैराण झाला होता. त्यामुळेच तो पुन्हा पुन्हा आजीची हत्या करण्याबाबत विचार करत होता. त्यानेच १२ एप्रिलला आजीच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला. नंतर मृतदेहावर तेल टाकून जाळून टाकला. त्यानंतर आई-वडिलांना फोन करून खोटी कहाणी सांगितली. हा खुलासा झाल्यावर त्याला पोलिसांनी अटक केली.