संपत्तीसाठी नातवाने केली आजोबांची हत्या, पाचही आरोपी जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 05:24 PM2018-09-06T17:24:57+5:302018-09-06T17:25:18+5:30

पोलिसांनी डोंबिवलीत राहणाऱ्या दोरजे तेनझिंग लामा (वय २९) या नातवासह अन्य चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 

Grandson murdered for grandpa for wealth, five accused arrested | संपत्तीसाठी नातवाने केली आजोबांची हत्या, पाचही आरोपी जेरबंद 

संपत्तीसाठी नातवाने केली आजोबांची हत्या, पाचही आरोपी जेरबंद 

मुंबई - फोर्ट परिसरात राहणाऱ्या ८६ वर्षीय अजा तेजलिंग लामा यांची छातीवर धारदार शस्त्राने वार करून ३ सप्टेंबरला रात्री ९. ३० वाजताच्या सुमारास हत्या करण्यात आली होती. याबाबत एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांना नातवानेच आजोबांच्या संपत्ती बळकावण्यासाठी ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी डोंबिवलीत राहणाऱ्या दोरजे तेनझिंग लामा (वय २९) या नातवासह अन्य चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 

गेल्या अनेक वर्षांपासून फोर्ट येथील संत निवास बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर वयोवृद्ध असलेले अजा हे राहतात. ३० वर्षांपूर्वी ते पत्नी आणि १ मुलगा आणि एका मुलीसोबत राहत होते. मात्र, कालांतराने अजा यांच्या पत्नीचे निधन झाले आणि मुलगा व सून डोंबिवलीतील घरी जाऊन राहू लागले. त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून ते घरी एकटेच राहत होते. वयोवृद्ध झालेले आजोबा कधी मरतात आणि त्यांची संपत्ती कधी आपल्या नावावर होते याची आस दोरजेला लागली होती. मात्र, आजोबा वयाच्या ८६ वर्षी देखील फिट असल्याने त्यांचा काटा काढण्याचा कट मित्रांच्या मदतीने नातवाने रचला. डोंबिवलीत राहणारा दोरजे हा त्याच्या कुटुंबासह डोंबिवलीत राहतो. दोरजे पत्नी आणि ३ वर्षांच्या मुलीसोबत राहतो. त्याचा त्रिशा इंटरनेट सर्व्हिसेस नावाने इंटरनेट सेवा पुरविण्याचा व्यवसाय आहे. मात्र, त्याला आजोबांची फोर्ट, कांदिवली येथील फ्लॅट आणि फोर्ट परिसरात असलेले फेरीवाल्यांची जागा हवी होती. त्यावर त्याचा डोळा होता. त्यामुळेच त्याने मित्रांच्या मदतीने २ ते ३ मित्रांना फोर्ट परिसरात पाठवून ठिकाणाची पाहणी करण्यास सांगितली. फोर्टमधील अजा यांचे घर ज्या बिल्डिंगमध्ये आहे तेथे कमर्शियल ऑफिसेस असून अजा यांचे एकाच रेसिडेंटशियल घर आहे.  त्यानुसार ३ सप्टेंबर रोजी  

 रात्री ९.३० वाजता ऑफिसेस बंद झाल्यांनतर वर्दळ कमी झाल्यानंतर उत्कर्ष उर्फ कृष्णा सोनी (वय २०) आणि जयेश उर्फ फॅन्ट्री कनोजिया (वय २०) यांनी चाकूने अजा यांचा खून करून पळ काढला. नंतर सकाळी बिल्डिंगमध्ये एका ऑफिसमध्ये आलेल्या एका व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षास कॉल केला आणि त्यानुसार एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून मृतदेह सेंट जॉर्ज रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला अशी माहिती एमआरए मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कांबळे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. 

याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासदरम्यान मृत अजा यांच्या नातेवाईकांची चौकशी सुरु केली. त्यावेळी पोलिसांनी अजा यांचा नातू दोरजे  याची चौकशी केली असता त्याच्याविरोधात डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस ठाण्यात ५ मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा केला आणि पोलिसांनी उत्कर्ष उर्फ कृष्णा सोनी (वय २०), अँजेल डेनियल भिसे (वय - २५), जयेश उर्फ फॅन्ट्री कनोजिया (वय २०) आणि आनंद दिलीप राय उर्फ कालिया (वय २२) या चौघांसह दोरजेला पोलिसांनी अटक केली. अद्याप हत्येसाठी वापरलेलं शस्त्र हस्तगत केलं नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कांबळे यांनी दिली. 

Web Title: Grandson murdered for grandpa for wealth, five accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.