आजी आणि आजोबांसह नातीची गळा चिरून हत्या; तिहेरी हत्याकांडाने गडचिरोली हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 08:04 AM2023-12-08T08:04:38+5:302023-12-08T08:04:51+5:30

जिल्ह्यात सध्या नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह सुरू आहे. या पार्श्वभूमीवर १८ दिवसांत चौघांची हत्या झाली आहे.

Grandson strangled with grandmother and grandfather; Gadchiroli was shaken by the triple murder | आजी आणि आजोबांसह नातीची गळा चिरून हत्या; तिहेरी हत्याकांडाने गडचिरोली हादरले

आजी आणि आजोबांसह नातीची गळा चिरून हत्या; तिहेरी हत्याकांडाने गडचिरोली हादरले

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गुंडापुरीत वृद्ध आजी-आजोबांसह नातीची गळा चिरून हत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय असून, पोलिसांनी त्यादृष्टीने तपास चक्रे गतिमान केली आहेत. दोन महिन्यांपूर्वी अहेरी तालुक्यातील महागावात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाली होती. आता गुंडापुरीतील तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला आहे. 

अर्चना रमशे तलांडे (१०, रा. येरकल, ता. एटापल्ली), देवू दसरू कुमोटी (६०), बिच्चे देवू कुमोटी (५५, रा. गुंडापुरी, ता. भामरागड) अशी मयतांची नावे आहेत. देवू कुमोटी यांची मुलगी  मरकल (ता. एटापल्ली) येथे राहते. चौथीत शिकणारी तिची कन्या अर्चना तलांडे ही दिवाळी सुटीत  आजी-आजोबांकडे आली होती.

हत्येमागे नक्षली कनेक्शन?   
जिल्ह्यात सध्या नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह सुरू आहे. या पार्श्वभूमीवर १८ दिवसांत चौघांची हत्या झाली आहे. त्यातच गुंडापुरीत गळा चिरलेले तिघांचे मृतदेह घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, ही घटना नक्षल्यांशी संबंधित नाही, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. संपत्तीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा अंदाज आहे. 

ही घटना वैयक्तिक संपत्तीच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. योग्य तो तपास करून आरोपींना जेरबंद केले जाईल. - नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली

Web Title: Grandson strangled with grandmother and grandfather; Gadchiroli was shaken by the triple murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.