ऐसी धाकड है... आजीबाई एकट्याच चोराशी भिडल्या; चार-सहा थपडा हाणल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 02:30 PM2018-08-28T14:30:27+5:302018-08-28T14:41:05+5:30

५४ वर्षाच्या आजी बाईंची कमाल, चोराशी केले दोन हात 

Granny has fight with the thief alone | ऐसी धाकड है... आजीबाई एकट्याच चोराशी भिडल्या; चार-सहा थपडा हाणल्या!

ऐसी धाकड है... आजीबाई एकट्याच चोराशी भिडल्या; चार-सहा थपडा हाणल्या!

Next

मुंबई - एका धाडसी आजीबाईंनी तिची बॅग पळविणाऱ्या चोरट्याशी दोन हात केले आहे. ५४ वर्षीय आजींनी आपली बॅग हिसकावून पाळणाऱ्या चोराशी लढत असताना ट्रेनमधून पडल्या तरीदेखील त्यांनी चोराचा पाठलाग सोडला नाही. ही घटना मस्जिद बंदर आणि सॅण्डहर्स्ट रोड दरम्यान घडली आहे. जखमी झालेल्या आजीवर अंधेरी एमआयडीसी येथील हॉली क्रॉस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अटक आरोपी मुकद्दर इदरसी (वय - २४) याला २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

अंधेरी येथील एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या प्रतिभा त्रिपाठी या आपल्या बहिणीकडे जाण्यासाठी २२ ऑगस्टला निघाल्या होत्या. उद्यान एक्सप्रेस या ट्रेनने त्या बंगळुरू येथे बहिणीकडे जात होत्या. सीएसएमटी रेल्वे स्थानकाहून उद्यान एक्सप्रेस ही ट्रेन निघण्याच्यादरम्यान प्रतिभा आजींनी बहिणीशी मोबाईलवर बोलून झाल्यावर मोबाईल हॅण्डबॅगमध्ये ठेवला. हळूहळू ट्रेन वेग घेत होती. त्यावेळी ट्रेनमध्ये चढलेल्या चोराने आजीची हॅण्डबॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी धाडसी आजीने मात्र आपली बॅग काही सोडली नाही. चोरट्याने बॅग खेचत खेचत आजीबाईंना ट्रेनच्या दरवाज्यापाशी नेले. नंतर चोराने बॅगसह ट्रेनमधून उडी मारली. बॅगसोबत आजीबाई सुद्धा ट्रेनबाहेर खाली पडल्या. या झटापटीत आजी जखमी झाल्या. त्यांच्या उजव्या खांद्याला आणि कमरेला फ्रॅक्चर झाले असून हाताच्या तळव्याला जखम झाली. जखमी झालेल्या आजीची पकड सैल झाल्याने चोर आजीची बॅग घेऊन पसार झाला. आजीच्या बागेत दागदागिने, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू होत्या. त्यानंतर आजीबाईंनी कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनच्या मोटरमनला हात दाखवून ट्रेन थांबविली. मोटरमनने जखमी आजीला डब्ब्यात घेतले. आजींनी भायखळा रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्टरशी संपर्क साधला असता त्यांना उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर रेल्वे पोलीसांनी चोर मुकद्दर इदरसीला २६ ऑगस्टला जे. जे. रुग्णालयाच्या परिसरातून अटक केली असून त्याने यापूर्वी देखील लोकलमध्ये मोबाईल चोरी केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी सांगितले. आजीला घरातील सर्वजण विमानाने जाण्यास सांगत होते. मात्र आजी ऐकली नाही. आता आजीवर हॉली क्रॉस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिला २ महिने अंथरुणात राहावे लागणार आहे. 

Web Title: Granny has fight with the thief alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.