राज्याच्या माजी मंत्र्यांना खंडणी मागणाऱ्या आरोपी डॉक्टरला ' या ' कारणासाठी तात्पुरता जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 05:43 PM2020-06-01T17:43:10+5:302020-06-01T17:44:20+5:30

राजकीय जीवनातून उद्धवस्त करण्याची धमकी देऊन ३० कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात डॉक्टराला अटक करण्यात आली होती.

Granted temporary bail for 'this' reason to accused doctor in Mocca act for ransom from former minister | राज्याच्या माजी मंत्र्यांना खंडणी मागणाऱ्या आरोपी डॉक्टरला ' या ' कारणासाठी तात्पुरता जामीन

राज्याच्या माजी मंत्र्यांना खंडणी मागणाऱ्या आरोपी डॉक्टरला ' या ' कारणासाठी तात्पुरता जामीन

Next
ठळक मुद्देकोरोना बाधितांची सेवा करण्याची केली होती इच्छा व्यक्त

पुणे : राज्याचे तत्कालीन पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर आणि शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतल्ले यांना राजकीय जीवनातून उद्धवस्त करण्याची धमकी देऊन ३० कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात मोक्काखाली गेली १ वर्षे येरवडा कारागृहात असलेल्या डॉक्टराला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांनी नुकताच २ महिन्यांचा तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. मोक्काखाली येरवडा कारागृहात असलेल्या या डॉक्टराने ससून रुग्णालयातकोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळेहा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
डॉ. इंद्रकुमार देवराव भिसे (वय ५२, रा. शिरुर) असे या डॉक्टराचे नाव आहे. डॉ. भिसे यांना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर ६० दिवसांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत. त्यात डॉक्टरांनी आठवड्यातील ५ दिवस डॉक्टर म्हणून ससून रुग्णालयात कोविड -१९ च्या रुग्णांवर उपचार करावेत. त्यांनी साक्षीदारांवर दबाव टाकू नये. या जामीनाची मुदत संपण्याअगोदर कारागृहात हजर रहावे. त्यावेळी त्याने ससून हॉस्पिटलच्या अधीक्षकांचे प्रमाणपत्र सादर करावे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
तत्कालीन मंत्री महादेव जानकर यांना फोन करुन तुमच्याविषयीच्या काही क्लिप्स आमच्याकडे आहेत. त्या माध्यमांपर्यंत पोहचवून तुमची बदनामी करु अशी धमकी दिली होती. ३० कोटी रुपयांच्या खंडणीतील पहिला हप्ता १५ कोटी रुपये स्वीकारताना बारामतीतील हॉटेल कृष्णसागरमध्ये आले असताना गेल्या वर्षी पोलिसांनी ५ जणांना पकडले होते. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.
डॉ. भिसे यांनी वैद्यकीय कारणासाठी जामीन अर्ज दाखल केला होता. देशातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी कमी शिक्षा असलेल्या कैद्यांना तात्पुरत्या जामीनावर सोडण्यास मंजूरी दिली. त्यानुसार काही हजार कैद्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. मात्र, डॉ. भिसे यांच्यावर मोक्कासारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याने त्यांची सुटका झाली नाही़ .

देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन डॉ. भिसे यांनी स्वत: कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आपल्याला जामीन द्यावा, असा अर्ज न्यायालयाकडे केला होता. अतिरक्त सत्र न्यायाधीश शिरसीकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  डॉ.भिसे यांचे म्हणणे ऐकून घेतले. ते खासगी हॉस्पिटलमध्ये गेली २० वर्षे स्त्रीरोगतज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतात. त्यांचे पुण्यातील सदाशिव पेठेत घर आहे. ते पळून जाण्याची शक्यता नाही़ असे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
उच्च स्तरीय समितीच्या नियमावलीनुसार, डॉ. भिसे यांना जामीन मिळू शकत नाही़ पण कोरोना बाधित रुग्णांची सेवा करण्यासाठी त्याचा विचार होऊ शकतो,असे निरीक्षण न्यायालयाने नमूद केली. देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्व वैद्यकीय विभागावर त्याचा मोठा ताण आला आहे. त्यामुळेशासनाने खासगी डॉक्टरांना शासकीय रुग्णालयात सेवा देण्याचे आवाहन केलेआहे. तसेच ससून रुग्णालयात सध्या १३६ खासगी डॉक्टर आपली सेवा देत असल्याचे न्यायालयाने सांगितले.  आरोपीला वैद्यकीय सेवेचा अनुभव असूनत्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाला उपयोग होईल. हे सर्व पाहता डॉ. भिसेयांची ससून रुग्णालयात सेवा करण्याची इच्छा लक्षात घेऊन समाजाच्याहितासाठी त्यांना तात्पुरता जामीन देणे योग्य होईल, असे नमूद करीत त्याचा ६० दिवसांसाठी तात्पुरता जामीन मंजूर केला.

Web Title: Granted temporary bail for 'this' reason to accused doctor in Mocca act for ransom from former minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.