आर्यन खानला मोठा दिलासा, पासपोर्ट परत देण्याचे NCBला निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 05:38 PM2022-07-13T17:38:55+5:302022-07-13T17:43:59+5:30
Aryan Khan : एसआयटीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात नाव वगळल्यानं आर्यनला क्लीन चीट मिळाली आहे.
मुंबई : आर्यन खानला मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. जामीन देताना एनसीबीकडे जमा केलेला पासपोर्ट परत देण्याचे निर्देश आज देण्यात आले आहेत. कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने शाहरूख खानचा मुलगा आर्यनला अटक केली होती. मात्र, एसआयटीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात नाव वगळल्यानं आर्यनला क्लीन चीट मिळाली आहे.
ड्रग्स केसप्रकरणी अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्लीन चिट देण्यात आली आहे. एनसीबीने आपल्या चार्जशीटमध्ये लिहिलं आहे की, आर्यन खान विरोधात कोणतेही पुरावे नाहीत. म्हणजे एनसीबीला आर्यन खानने ड्रग्स घेतल्याचे किंवा त्याच्याकडे ड्रग्स असल्याचे पुरावे सापडले नाहीत.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली करण्यात आली आहे. ऑर्डरनुसार, समीन वानखेडे यांना विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन महासंचालनालय (DGARM) मुंबईहून चेन्नई डीजी, टॅक्सपेयर्स सर्व्हिस डायरेक्ट्रेट म्हणून पाठविण्यात आले आहे.