युद्ध आमुचे सुरू... जम्मू-काश्मीरमध्ये सहा महिन्यात 93 दहशतवाद्यांना कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 08:06 PM2020-06-08T20:06:50+5:302020-06-08T20:08:34+5:30
आगामी काळात दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधून काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असता काश्मीर खोऱ्यात चकमकींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
श्रीनगर - जवळपास ६ सहा महिन्यांच्या कालावधीत सुरक्षा दलाने ९३ दहशतवाद्यांना कंठस्थान कंठस्नान घालून मोठं यश मिळवले आहे. या दहशतवाद्यांमध्ये टॉप लीडर असलेल्या दहशतवाद्यांचा समावेश आहे.
आज सकाळी भारतीय सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले आहे. जम्मू काश्मीरचे पोलीस आणि भारतीय लष्कर या दोघांनी एकत्र येऊन सदर कारवाई करत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. भारतीय सुरक्षा दल यांची ही चकमक बराच वेळ चालली. शोपियाँ जिल्ह्यातील पिंजोरा भागात ही चकमक झाल्याचे वृत्त ANIने दिले. याबाबत अधिक माहिती अजून मिळाली नाही. आज सकाळपर्यंत जम्मू - काश्मीरमध्ये गेल्या सहा महिन्यात ९३ दहशतवाद्यांच्या सुरक्षा दलाने खात्मा केला आहे.
गेल्या दोन दिवसांत काश्मीरच्या खोऱ्यात ९ दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला असून आपल्या लष्करातील कोणाचाही प्राणघात या कारवाईत झालेला नाही. काही दिवसांपूर्वी पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एकत्र येत जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. नियंत्रण रेषा (एलओसी) आणि दुर्गम भागात दहशतवादविरोधी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांविरोधात मोहीम उभारली आहे. दोन टॉप दहशतवादी लीडर रियाझ नायकू आणि जुनैद सेहराई यांच्यासह परदेशी दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला होता. जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा आणि पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचे हे दहशतवादी असल्याचे उघडकीस आले आहे. आगामी काळात दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधून काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असता काश्मीर खोऱ्यात चकमकींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
श्रीनगर - ८ जूनपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये ९३ दहशवाद्यांच्या सुरक्षा दलाने केला खात्मा
— Lokmat (@MiLOKMAT) June 8, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या :
धक्कादायक! अनुकंपा नोकरी मिळविण्यासाठी पित्याला ठार मारले; आई, भावाचीही मदत
खूनप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत दाखल
३० वर्षांपूर्वी झाला होता कथित 'मृत्यू'; बँक फसवणुकीत CBIची तपासाची चक्रे फिरली अन् निघाला जिवंत
आयएएस अधिकाऱ्यावर महिलेने केला लैंगिक शोषणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी केले निलंबित
उमरग्यात खून करुन पुण्यात आलेल्या दोघांना अटक
लॉकडाऊन दरम्यान स्पा सेंटरच्या नावाखाली चालवले जात होते सेक्स रॅकेट