मोठं यश! जम्मू - काश्मीरमध्ये गोळीबारात हिजबुल मुजाहिद्दीनच्या टॉप कमांडरला केले ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 04:48 PM2020-05-19T16:48:57+5:302020-05-19T16:51:22+5:30
जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं असून श्रीनगरच्या नवाकडल भागात झालेल्या चकमकीनंतर दोन हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले.
जम्मू - काश्मीर : श्रीनगर येथे हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर आणि हुर्रियतच्या अध्यक्ष यांचा मुलगा जुनैद सहराई याला गोळीबारात ठार केले आहे. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं असून श्रीनगरच्या नवाकडल भागात झालेल्या चकमकीनंतर दोन हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले.
दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव जुनैद सहराई असून तो कट्टरपंथीय फुटीरतावादी आणि तहरीक-ए-हुर्रियतचे अध्यक्ष अशरफ सेहराई याचा मुलगा आहेत, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने पोलिसांच्या हवाल्याने दिली आहे. अतिरेकी लपण्याच्या ठिकाणाबाबत माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने चोख बंदोबस्त दिल्यानंतर या चकमकीला सुरवात झाली. काल रात्री झालेल्या कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान गोळीबार सुरू झाला. ठार झालेल्या दहशतवाद्यांजवळून दोन शस्त्रे आणि अनेक काडतुसे, दारू जप्त करण्यात आले आहेत.
जम्मू-काश्मीरचेपोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असल्याचे सांगितले. तसेच जुनेद अनेक गुन्हेगारी प्रकरणात वाँटेड होता. “काल रात्रीच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले. श्रीनगर येथील जुनैद अशरफ खान आणि पुलवामा येथील तारिक अहमद शेख अशी त्यांची नावे आहेत. जुनैद हुर्रियतचे अध्यक्ष मोहम्मद अशरफ खान यांचा धाकटा मुलगा आहे, असे ”जम्मू-काश्मीरचे डीजीपी म्हणाले.
ड्युटी संपवून घरी जाणारा पोलीस अपघातात जखमी, प्रकृती चिंताजनक
#WATCH Jammu & Kashmir: Encounter underway between security forces & terrorists in Nawakadal area of Srinagar. 2 terrorists have been killed in the operation so far. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/kdizpz3L1F
— ANI (@ANI) May 19, 2020
Coronavirus : 'हॉटस्पॉट' मुंबईत केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात, उद्धव ठाकरेंनी केली होती मागणी