धक्कादायक! ५०० रूपयांच्या नोटेवरून झाला पती-पत्नीत वाद, मेहुण्याने भाओजीचा केला मर्डर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 11:53 AM2021-09-22T11:53:52+5:302021-09-22T11:55:39+5:30

दोघांमधील वाद इतका वाढला की, रागात आरिफच्या पत्नीने माहेरच्या लोकांना फोन लावला आणि त्यांना घरी बोलवून घेतलं.

Greater Noida crime dispute over Rs 500 note brother in law killed man | धक्कादायक! ५०० रूपयांच्या नोटेवरून झाला पती-पत्नीत वाद, मेहुण्याने भाओजीचा केला मर्डर

धक्कादायक! ५०० रूपयांच्या नोटेवरून झाला पती-पत्नीत वाद, मेहुण्याने भाओजीचा केला मर्डर

Next

ग्रेटर नोएडामध्ये केवळ ५०० रूपयांबाबत पत्नीला विचारणा केल्यावरून वाद इतका वाढला की, पत्नीचे सासरचे लोक तिच्या घरी पोहोचले आणि पतीला बेदम मारहाण केली. पत्नीच्या भावाने आपल्या साथीदारांसोबत भाओजीला इतकी मारहाण केली की, यात भाओजीचा मृत्यू झाला. 

मृत आरिफचं ८ वर्षापूर्वी छोलस गावातील एमनसोबत लग्न झालं होतं. आरिफ मिस्त्रिचं काम करत होता. १८ सप्टेंबरला आरिफकडून ५०० रूपयांची नोट कुठेतरी हरवली होती. आरिफने ५०० रूपयांची नोट न सापडल्याने त्याबाबत पत्नीला विचारणा केली. पण यावरून पत्नीने त्याच्यासोबत भांडण सुरू केलं. (हे पण वाचा : सासरी जाऊन पतीने पत्नीच्या डोक्यावर झाडली गोळी, तीन महिन्यांआधीच केलं होतं कोर्ट मॅरेज)

दोघांमधील वाद इतका वाढला की, रागात आरिफच्या पत्नीने माहेरच्या लोकांना फोन लावला आणि त्यांना घरी बोलवून घेतलं. आरिफचा मेहुणा नदीम आपल्या काही मित्रांसोबत तिथे पोहोचला. त्याने आपल्या भाओजीला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर आरिफची हालत खराब झाली. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण तो वाचू शकला नाही.

हत्येच्या या खळबळजनक घटनेनंतर आरिफच्या नातेवाईकांनी मृतकाचा मेहुणा नदीमसहीत काही अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. गंभीरपणे  जखमी झालेल्या आरिफला उपचारासाठी दिल्लीच्या जीबी पंत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
 

Web Title: Greater Noida crime dispute over Rs 500 note brother in law killed man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.