धक्कादायक! मोठ्या बहिणीसोबत लहान भावाने केला रेप, गर्भवती झाली तेव्हा झाला घटनेचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 06:12 PM2021-07-08T18:12:31+5:302021-07-08T18:13:14+5:30
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पीडित मुलीचं काउन्सेलिंग सुरू आहे. लहान भावाने तीन महिन्यांपूर्वी मोठ्या बहिणीवर रेप केला होता.
ग्रेटर नोएडामधून भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. इथे एका लहान भावाने आपल्याच मोठ्या बहिणीवर रेप केला. बहीण जेव्हा गर्भवती झाली तेव्हा भावाने केलेल्या या कृत्याचा खुलासा झाला. भाऊ-बहीण दोघेही अल्पवयीन आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याला बाल सुधार गृहात पाठवलं आहे.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पीडित मुलीचं काउन्सेलिंग सुरू आहे. लहान भावाने तीन महिन्यांपूर्वी मोठ्या बहिणीवर रेप केला होता. पीडिता जेव्हा गर्भवती झाली तेव्हा भावाच्या या कृत्याबाबत घरातील लोकांना समजलं. सोमवारी पीडिता अचानक रडू लागली होती. जेव्हा आईने तिला रडण्याचं कारण विचारलं तर ही घटना समोर आली. कुटुंबीयांनी पोलिसात याची तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली. (हे पण वाचा : महिला शिक्षिकेने १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती ठेवले शरीरसंबंध, CCTV मध्ये रेकॉर्ड झाली घटना)
धक्कादायक बाब म्हणजे आरोपी आणि पीडित बहीण दोघेही अल्पवयीन आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच वय १६ असून ८व्या वर्गात शिकते. तर तिचा आरोपी भाऊही अल्पवयीन आहे. पोलिसांना पीडितेने सांगितलं की, तिच्या छोट्या भावाने तीन महिन्यांआधी आणि त्यानंतरही काही दिवसांआधी दोनदा तिच्यावर अत्याचार केला. ज्यानंतर ती गर्भवती झाली.