लग्नाच्या एक दिवसआधी गॅस कटरने ATM मशीन कापत होता नवरदेव आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 09:32 AM2023-02-08T09:32:23+5:302023-02-08T09:33:15+5:30
Cutting ATM With Gas Cutter: या सगळ्यात त्याने एटीएम मशीन कापण्याचा प्लान केला. रिपोर्टनुसार, फिरोजाबादमध्येच सगळ्यात आधी दोन फेब्रुवारीला तो जलेसर रोडवरील एक एटीएम कापण्यासाठी गेला होता.
Cutting ATM With Gas Cutter: लग्नाबाबत सतत काहीना काही अजब घटना समोर येत असतात. काही तर अशा असतात ज्यांवर विश्वासही बसत नाही. एक अशी घटना समोर आली आहे जी फारच हैराण करणारी आहे. लग्नाच्या ठीक अगोदर एक नवरदेवाला अटक करण्यात आली आहे. त्याला एटीएम मशीन कापताना पकडण्यात आलं. त्याच्याकडून गॅस कटर मशीन आणि गॅस सिलेंडरसहीत काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्या. हैराण करणारी बाब म्हणजे त्याने तीन दिवस एटीएम मशीन कापण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी तो पकडला गेला.
ही घटना उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी नवरदेवाचं नाव आकाश गुप्ता आहे आणि मंगळवारी 7 फेब्रुवारीला त्याचं लग्न होतं आणि त्याच्याकडे लग्नात खर्च करण्यासाठी पैसे नव्हते. असं सांगण्यात आलं की, तो आधी काचाचा व्यापारी होता आणि नंतर कोरोना दरम्यान त्याच्या बिझनेसचं खूप नुकसान झालं होतं. त्याच्या आई-वडिलांचंही निधन झालं होतं.
या सगळ्यात त्याने एटीएम मशीन कापण्याचा प्लान केला. रिपोर्टनुसार, फिरोजाबादमध्येच सगळ्यात आधी दोन फेब्रुवारीला तो जलेसर रोडवरील एक एटीएम कापण्यासाठी गेला होता. पण सिक्युरिटी गार्ड दिसल्यावर तो तिथून निघून गेला. दोन दिवसांनी पुन्हा तो त्याच एटीएमला कापण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शार्ट सर्किट झालं आणि तो पुन्हा परत गेला.
शेवटी तो सोमवारी विभव नगरमधील पंजाब नॅशनल बॅंकचं एटीएम कापत होता तेव्हा त्याला पकडण्यात आलं. झालं असं की, थोड्या अंतरावर गॉर्ड होते आणि त्यांनी त्याला रंगेहाथ पकडलं. हैराण करणारी बाब म्हणजे दुसऱ्या दिवशीच त्याचं लग्न होतं. पण त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने हे कृत्य केलं. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला आहे.