धक्कादायक! लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने केलं खतरनाक कृत्य, मंडपाऐवजी तुरूंगात झाली पाठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 15:29 IST2022-05-09T15:27:16+5:302022-05-09T15:29:27+5:30
Groom fired gun : ही घटना बसीकलां गावातील आहे. येथील राहणारा इस्तेकारचं लग्न गावातीलच अफजल नावाच्या व्यक्तीच्या मुलीसोबत ठरलं होतं.

धक्कादायक! लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने केलं खतरनाक कृत्य, मंडपाऐवजी तुरूंगात झाली पाठवणी
Groom fired gun : उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात सोशल मीडियावर एका तरूणाचा काही लोकांवर गोळी झाडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, व्हिडीओत गोळी झाडणारा दुसरा तिसरा कुणी नसून एक नवरदेव आहे. जो त्याच्या लग्नाच्या एक दिवसआधी डीजेवरून झालेल्या वादातून आपल्या सासरकडील लोकांवर थेट गोळीबार करत आहे. यावेळी एका व्यक्तीला गोळी लागून ती जखमी झाली.
झी न्यूजच्या वत्तानुसार, ही घटना बसीकलां गावातील आहे. येथील राहणारा इस्तेकारचं लग्न गावातीलच अफजल नावाच्या व्यक्तीच्या मुलीसोबत ठरलं होतं. गावातीलच एका हॉलमध्ये लग्न होणार होतं. पण रात्री दोन्हीकडील लोकांमध्ये डीजेवरून काहीतरी वाद झाला. त्यावेळी तर वाद कसातरी मिटला. पण दुसऱ्या दिवशी रविवारी ज्या दिवशी वरात येणार होती तेव्हा पुन्हा दोन्ही पक्षाकडील लोक समोरासमोर आले.
बघता बघता दोन्हीकडील लोकांना दगडफेक सुरू केली. असं सांगितलं जात आहे की, यावेळी नवरदेव इस्तेकारने आपल्या घराच्या छतावरून नवरीकडील लोकांवर थेट गोळी चालवली. गोळी लागल्याने नवरीकडील एक ५ वर्षीय व्यक्ती जखमीही झाली. नवरदेवाने केलेल्या फायरिंग व्हिडीओ कुणीतरी रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.
घटनेची सूचना मिळताच पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी लोकांना शांत करत जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. या व्यक्तीची स्थिती गंभीर असल्याने त्याला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं होतं. सोमवारी उपचारा दरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी कारवाई करत नवरदेवाला अटक केली. तसेच त्याच्याकडील पिस्तुलही ताब्यात घेतलं.