'ती माझी आहे...वरात आणायची नाही, सगळ्यांचा जीव जाईल', तरूणाने नवरदेवाच्या घरावर लावले धमकीचे पोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 09:24 IST2023-01-31T09:20:27+5:302023-01-31T09:24:14+5:30
नवरदेवाच्या घराबाहेर एक पोस्टर लावण्यात आलं आहे. यात लिहिलं आहे की, 'दुल्हे राजा...ती माझी आहे....वरात घेऊन येण्याची हिंमत करू नको...नाही तर अनेकांचा जीव जाईल...!

'ती माझी आहे...वरात आणायची नाही, सगळ्यांचा जीव जाईल', तरूणाने नवरदेवाच्या घरावर लावले धमकीचे पोस्टर
उत्तर प्रदेशच्या हापुड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे नवरीच्या घरी वरात घेऊन येणाऱ्या नवरदेवाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नवरदेवाच्या घराबाहेर एक पोस्टर लावण्यात आलं आहे. यात लिहिलं आहे की, 'दुल्हे राजा...ती माझी आहे....वरात घेऊन येण्याची हिंमत करू नको...नाही तर अनेकांचा जीव जाईल...!
कान उघडे करून ऐक मोन्टू सिंह दुल्हे राजा..ती माझी आहे...वरात घेऊन येऊ नको. नाही तर तुझा जीव जाईल. वरात स्मशान बनवून ठेवीन. ज्या भावांना वरातीत जेवणासोबत गोळी खायची असेल त्यांनीच यावं. हा केवळ ट्रेलर होता, सिनेमा वरतीत होईल. यार डिफॉल्टर...
हा धमकीचे पोस्टर नवरेदवाच्या घराबाहेर आणि परिसरात अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. ही घटना हापुड जिल्ह्याच्या फरीदपुर गावातील आहे. या पोस्टरमुळे गावातील सगळे लोक हैराण आहेत. पीडित नवरदेव जय सिंह याने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना 27 आणि 28 जानेवारी रात्री 2.15 वाजताची सांगितली जात आहे. इतकंच नाही तर काही लोकांनी आजूबाजूच्या घरांवर पेट्रोल बॉम्बही फेकले. ज्यांच्या आवाजाने नवरदेव आणि त्याच्या घरातील लोक जागे झाले. बेकायदेशीर पिस्तुलीने तीन फायरही करण्यात आले. या घटनेनंतर सगळेच घाबरले आहेत.
याबाबत एसपी अभिषेक वर्मा यांच्या आदेशानंतर धमकी देणाऱ्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेतला जात आहे. सध्या अजून कुणालाही अटक झालेली नाही. पोलिसांनी सांगितलं की, आरोपींना लवकरच पकडलं जाईल.