दुसरं लग्न करून पळून गेला नवरदेव, नवरी त्याची गावी पोहोचली आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 02:17 PM2022-06-22T14:17:56+5:302022-06-22T14:18:29+5:30

Wedding News: ढका गावातील एक तरूणी नोएडामध्ये आपल्या भावासोबत नोकरी करत होती. वडील आजारी होते. नोएडामध्येच तिची ओळख पवन नावाच्या तरूणासोबत झाली होती.

Groom ran away after second marriage, bride reached the village know what happen next | दुसरं लग्न करून पळून गेला नवरदेव, नवरी त्याची गावी पोहोचली आणि मग....

दुसरं लग्न करून पळून गेला नवरदेव, नवरी त्याची गावी पोहोचली आणि मग....

googlenewsNext

Wedding News: उत्तर प्रदेशच्या बदायूंमधील अलापूरमध्ये एक अशी घटना समोर आली आहे ज्याबाबत सगळेच हैराण झालेत. पोलिसांनी एका तरूणाला अटक केली कारण त्याने फसवणूक करून मंदिरात दुसरं लग्न केलं. असं सांगितलं जात आहे की, त्याच्या पत्नीने तक्रार दिल्यापासून तो फरार होता. पोलिसांनी त्याला अटक करून कोर्टात हजर केलं आहे. ढका गावातील एक तरूणी नोएडामध्ये आपल्या भावासोबत नोकरी करत होती. वडील आजारी होते. नोएडामध्येच तिची ओळख पवन नावाच्या तरूणासोबत झाली होती.

पवनने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि दोघेही घरातील लोकांच्या लपून भेटत होते. दोघांनी नोएडाच्या मंदिरात लग्न केलं. दोघेही प्रेमात पडले. दोघांनी सोबत जगण्या-मरणाच्या शपथा घेतल्या. आरोप आहे की, तरूण जेव्हा त्याच्या गावी गेला तेव्हा तरूणीने त्याला संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याने फोन उचलणं बंद केलं. ती प्रतिक्षेचा बांध फुटला आणि ती त्याच्या घरी पोहोचली. तेव्हा तिला समजलं की, तरूण आधीच विवाहित आहे आणि त्याला चार वर्षांचा एक मुलगाही आहे. त्याची पत्नी घरी होती. हे सगळं बघून तरूणीला धक्का बसला.

प्रकरण पोलिसात गेल्याने दोन्ही परिवारात चर्चा झाली. नंतर पोलिसांनी तरूणीच्या तक्रारीनंतर आरोपी पवनला अटक करत तुरूंगात पाठवलं. सध्या परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे. पोलिसांनी सांगितलं की, पहिल्या पत्नीला दगा देऊन दुसरं लग्न करणाऱ्या तरूणाला अटक करण्यात आली आहे.  

Web Title: Groom ran away after second marriage, bride reached the village know what happen next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.