आरे कॉलनीनजीकच्या जंगलाला भीषण आग 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 08:51 PM2018-12-03T20:51:16+5:302018-12-04T01:15:54+5:30

वन विभागाचे अधिकारी, पोलीसही घटनास्थळी आहेत. आगीमुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे १०० जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.  

Ground Fire in Aare Colony | आरे कॉलनीनजीकच्या जंगलाला भीषण आग 

आरे कॉलनीनजीकच्या जंगलाला भीषण आग 

googlenewsNext
ठळक मुद्देजनरल अरुणकुमार वैद्य मार्ग जंगलाला आज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास आग लागलीजंगल परिसर असल्याने आग अद्यापही धुमसत असल्याने आग पसरत आहे. अग्निशमन दलाचे १०० जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.  

मुंबई - गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीनजीक असलेल्या नागरी निवारा परिषदेमागील जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग जंगलाला आज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. जंगल परिसर असल्याने आग अद्यापही धुमसत असल्याने आग पसरत आहे.  नागरी निवारा परिषदेतील आयटी पार्कच्या मागील डोंगरावर ही आग लागली आहे. वन विभागाचे अधिकारी, पोलीसही घटनास्थळी आहेत. आगीमुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे १०० जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.  


दरम्यान, आगीची झळ ही म्हाडाच्या 78 उच्च उत्पन्न बंगल्याला पोहचू नये यासाठी येथील नागरिकांनी सुरक्षतेचा उपाय म्हणून आपले बंगले रिकामे केले आहेत.या बंगल्यांना आगीची झळ पोहचू नये यासाठी आपण मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांच्याशी बोललो असून येथील आग लवकर नियंत्रणात आणण्यासाठी अनेक बंब हे आरे कॉलनीतून फिरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.आमदार प्रभू व स्थानिक नगरसेवक व शिवसैनिक मदतकार्यासाठी घटनास्थळी असल्याचे त्यांनी सांगितले.


Web Title: Ground Fire in Aare Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.