नाराज पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या पतीला पाजले तेजाब; तडफडून मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 01:40 PM2023-08-13T13:40:47+5:302023-08-13T13:41:20+5:30

पत्नी, सासू-सासरे आणि मेव्हण्याची मारहाण, चारही आरोपी फरार.

gujarat-ahmedabad-crime-news-wife-killed-husband-inlaws-involved-in-crime | नाराज पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या पतीला पाजले तेजाब; तडफडून मृत्यू...

नाराज पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या पतीला पाजले तेजाब; तडफडून मृत्यू...

googlenewsNext

अहमदाबाद: सासरची मंडळी आपल्या जावयाचे सर्व लाड पुरवतात, अशी अनेक उदाहरणे तुम्ही पाहिली असतील. पण, गुजरातच्या अहमदाबादमदून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे आपल्या जावयाला अॅसिड(तेजाब) पाजून ठार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी, सासू, सासरे यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही मृत व्यक्तीवर सासरच्या लोकांनी जीवघेणे हल्ले केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अहमदाबादच्या मधुपुरा भागातील आहे. येथील गीता मंदिराजवळ राहणारे प्रल्हाद भाई वाघेला यांची पत्नी अनेक दिवसांपासून माहेरी गेली होती. प्रल्हाद भाई यांनी अनेकदा पत्नीला परत येण्याची विनंती केली, पण ती ऐकायला तयार नव्हती. अखेर ते स्वतः पत्नीला घरी आणण्यासाठी सासरी गेले. 

पतीला पाजले 'तेजाब'
11 ऑगस्टच्या रात्री ते पत्नीला आणण्यासाठी तिच्या घरी गेले, तिथे त्यांच्यात परत एकदा जोरदार भांडण झाले. यादरम्यान, पत्नी, सासू, सासरे आणि मेव्हण्याने प्रल्हाद भाई यांना जबर मारहाण केली. यानंतर त्या चौघांनी मिळून प्रल्हाद भाई यांना बळजबरीने अॅसिड(तेजाब) पाजले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रल्हाद भाई यांना रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण अॅसिड आणि मारहाण सांगण्यात आले आहे.

घटनेनंतर सर्व आरोपी फरार
प्रल्हाद भाई वाघेला आणि शिल्पा यांचा विवाह 2010 साली झाला होता. त्यांना दोन मुलीही आहेत. प्रल्हाद यांचा मृत्यू झाल्यामुळे मुलींच्या डोक्यावरचे बापाचे छत्र हरवले आहे. या घटनेनंतर सर्वजण घराला कुलूप लावून फरार झाले आहेत. त्यांना अटक करण्यासाठी मधुपुरा पोलीस कारवाई करत आहेत. या चारही जणांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: gujarat-ahmedabad-crime-news-wife-killed-husband-inlaws-involved-in-crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.