गुजरात एटीएसने आयसिसच्या दहशतवाद्याला केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 21:50 IST2020-01-09T21:50:03+5:302020-01-09T21:50:40+5:30
गेल्या १० ते १२ दिवसांपासून जफर वडोदऱ्यात आयसिसच्या मोड्युलचे प्रसार करण्यासाठी आला होता.

गुजरात एटीएसने आयसिसच्या दहशतवाद्याला केली अटक
गुजरात - गुजरातएटीएसने (दहशतवादविरोधी पथक) वडोदरा येथून आयसिसच्या एका दहशतवाद्याला बेड्या ठोकल्या आहेत. जफर अली असं मुसक्या आवळलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. जफरला वडोदऱ्यातील गोरवा परिसरातून अटक करण्यात आली आहे. जफर हा तामिळनाडूत वॉन्टेड होता. गेल्या १० ते १२ दिवसांपासून जफर वडोदऱ्यात आयसिसच्या मोड्युलचे प्रसार करण्यासाठी आला होता.
Gujarat ATS: A terrorist named Zafar Ali has been arrested from Vadodara's Gorva area. He is wanted in Tamil Nadu. From last 10 to 12 days, he was in Vadodara to spread ISIS module. pic.twitter.com/dnJ12VEAL4
— ANI (@ANI) January 9, 2020