मुलगा रुग्णालयात आहे सांगून वृद्धाने रडत रडत मागितली लिफ्ट अन्...; 'असा' होता भयंकर कट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 08:18 PM2022-09-29T20:18:19+5:302022-09-29T20:48:05+5:30

एका कार चालकाने रस्त्यावर रडणाऱ्या एका वृद्धाला लिफ्ट दिली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे हा कार चालक हनी ट्रॅपचा बळी ठरला आहे.

gujarat crime news car driver-victim honey trap five lakhs lost four accused arrested in surat | मुलगा रुग्णालयात आहे सांगून वृद्धाने रडत रडत मागितली लिफ्ट अन्...; 'असा' होता भयंकर कट

मुलगा रुग्णालयात आहे सांगून वृद्धाने रडत रडत मागितली लिफ्ट अन्...; 'असा' होता भयंकर कट

Next

गुजरातच्या सूरतमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. एका वृद्ध व्यक्तीला मदत करणं कार चालकाला चांगलंच महागात पडलं आहे. महिधरपुरा भागातून जात असताना एका कार चालकाने रस्त्यावर रडणाऱ्या एका वृद्धाला लिफ्ट दिली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे हा कार चालक हनी ट्रॅपचा बळी ठरला आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या कार चालकाला पाच लाख रुपये द्यावे लागले. एक महिन्यानंतर कार चालकाने पोलिसात तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह चौघांना अटक केली आहे.

सूरतचे पोलीस आयुक्त अजय कुमार तोमर यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, गेल्या महिन्यात 25 ऑगस्ट रोजी एक कार चालक कार घेऊन महिधरपुरा भागातून जात होता. त्याचवेळी एका वृद्धाने कार चालकाला लिफ्ट मागण्याचा इशारा करत थांबवले. ही वयोवृद्ध व्यक्ती रडत असल्याचे पाहून कार चालकाने कार थांबवली आणि ते का रडत आहेत याचे कारण विचारले. तेव्हा वृद्धाने सांगितले की, माझा मुलगा रुग्णालयात दाखल आहे, मला त्याच्याकडे कोणत्याही परिस्थितीत तातडीने पोहोचायचे आहे.

कार चालकाने मदतीसाठी वृद्धाला गाडीत बसवले आणि त्याने सांगितलेल्या पत्त्यावर तो घेऊन गेला. वाटेत अचानक वृद्धाने कार चालकाच्या मानेवर चाकू ठेवला आणि जीवे मारण्याची धमकी देत मी जिथे जायला सांगतोय तिथे चल, असे सांगितले. वृद्धाचे हे कृत्य पाहून कारचालक घाबरला आणि त्याने सांगितलेल्या पत्त्यावर कार नेली. कार सूरत शहरातील अडाजन भागातील मधुबन सर्कलजवळ पोहोचली. तिथे कार थांबवून त्या वृद्धाने कार चालकाला एका फ्लॅटमध्ये नेले. त्या फ्लॅटमध्ये दोन पुरुष आणि दोन महिला आधीच हजर होते. उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने पोलीस असल्याची बतावणी करून चालकाला धमकावत काही आक्षेपार्ह फोटो काढले. 

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 20 लाख रुपयांची मागणी केली. तसेच पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी सुद्धा दिली. यातून बाहेर पडण्यासाठी कार चालकाने त्यांना पाच लाख रुपये दिले. यानंतर आरोपींनी ड्रायव्हरला सुरतच्या मोती टॉकीजजवळ सोडले. या घटनेने कार चालक घाबरला. एका महिन्यानंतर, त्याने हिंमत दाखवली आणि 23 सप्टेंबर रोजी सुरतमधील अडाजन पोलिस ठाण्यात आपण हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर सुरत गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठीवेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: gujarat crime news car driver-victim honey trap five lakhs lost four accused arrested in surat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.