धक्कादायक! दीड कोटींच्या लॉटरीच्या लालसेपोटी महिलेने गमावले 17 लाख, झालं असं काही..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 05:21 PM2023-08-31T17:21:02+5:302023-08-31T17:25:35+5:30
महिलेच्या Whatsapp वर 1 कोटी 40 लाख रुपयांची लॉटरी जिंकल्यासारखे मेसेज येत होते.
गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेला दीड कोटी रुपयांच्या लॉटरीच्या हव्यासापोटी 17 लाख रुपये गमवावे लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार केली आहे. प्रत्यक्षात महिलेच्या Whatsapp वर 1 कोटी 40 लाख रुपयांची लॉटरी जिंकल्यासारखे मेसेज येत होते.
महिलेने त्यावर क्लिक केल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी तिला जाळ्यात अडकवलं. यानंतर वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण 17 लाख रुपयांचा गंडा घातला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने त्वरीत पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली.
दाहोद बुरहानी सोसायटीतील शिरीन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रशिदाबेन हुसेनभाई मन्सूरभाई यांना वेगवेगळ्या नंबरवरून Whatsapp मेसेज येत होते. यामध्ये व्हाउचर क्रमांक आणि आणखी एक क्रमांक निवडण्यास सांगितले होते.
नंबर निवडल्यानंतर रशिदाबेन यांना हिऱ्यांचा सेट, एक सोन्याचा सेट, एक आयफोन आणि एक पाऊंड भेट म्हणून देण्यास सांगण्यात आले. यासोबतच त्यांनी 1 कोटी 40 लाख रुपयांची लॉटरी जिंकल्याचीही चर्चा आहे. रशिदाबेन या लोकांच्या जाळ्यात अडकल्या.
रशिदाबेन यांच्या वेगवेगळ्या खात्यांमधून हळूहळू सुमारे 17 लाख रुपये ट्रान्सफर केले. यानंतरही भेटवस्तू आणि लॉटरीची रक्कम न मिळाल्याने रशिदाबेन यांची फसवणूक झाल्याचं समोर आलं. फसवणूक केल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी रशिदाबेनला Whatsapp वर पाठवलेले सर्व मेसेज डिलीट केले.पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.