पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडलं, मग केले 11 वेळा चाकूने वार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 01:18 PM2022-07-01T13:18:16+5:302022-07-01T13:19:49+5:30
Gujarat : रिपोर्टनुसार, इब्राहिम नॅसी नावाच्या महिलेवर प्रेम करत होता आणि आठ वर्षाआधी त्याने तिच्यासोबत लग्न केलं होतं.
Gujarat: गुजरातच्या राजकोटमध्ये एका पतीने त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं आणि नंतर त्याने तिच्या प्रियकरावर चाकूने वार केला. आरोपीने कथितपणे पत्नीच्या प्रियकरावर चाकूने 11 वेळा वार केला. ही घटना राजकोटच्या यूनिव्हर्सिटी भागातील आहे. आरोपीचं नाव इब्राहिम आहे. रिपोर्टनुसार, इब्राहिम नॅसी नावाच्या महिलेवर प्रेम करत होता आणि आठ वर्षाआधी त्याने तिच्यासोबत लग्न केलं होतं.
कथितपणे नॅसीचे इब्राहिमचा मित्र अख्तरसोबत अनैतिक संबंध होते. एक दिवस इब्राहिमने नॅसीला अख्तरसोबत आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडलं होतं. ज्यामुळे तो चांगलाच संतापला होता. रागाच्या भरात त्याने चाकूने अख्तरवर 11 वेळा वार केले. घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत हुसैन इब्राहिमला ताब्यात घेतलं.
दरम्यान एका दुसऱ्या घटनेत एका महिलेवर प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा कापून हत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना आदर्शमंडी जिल्ह्यातील हरदेवनगरमधील आहे. सोमवारी जेव्हा हत्येचा खुलासा झाला तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांनी हत्येत वापरलेलं शस्त्रही ताब्यात घेतलं. मृत व्यक्तीच्या आईने पोलिसात महिला आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दिली होती.