आई संतापून म्हणाली 'अरे काही तरी कामधंदा कर..'; मुलानं जे केलं ते पाहून सारेच सुन्न झाले! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 11:47 AM2022-06-10T11:47:47+5:302022-06-10T11:48:39+5:30

भुजच्या जुन्या रावळवाडीत मुलानं आपल्या आईवर चाकूनं हल्ला करून पळ काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

gujarat kutch jobless son attack on his mother | आई संतापून म्हणाली 'अरे काही तरी कामधंदा कर..'; मुलानं जे केलं ते पाहून सारेच सुन्न झाले! 

आई संतापून म्हणाली 'अरे काही तरी कामधंदा कर..'; मुलानं जे केलं ते पाहून सारेच सुन्न झाले! 

Next

कच्छ

भुजच्या जुन्या रावळवाडीत मुलानं आपल्या आईवर चाकूनं हल्ला करून पळ काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुनी रावळवाडी परिसरात राहणाऱ्या गोमतीबेन प्रेमजीभाई वाघेला या महिलेनं भुज पोलिसात फिर्याद दिली असून यात त्यांनी आपला मुलगा अमृत प्रेमजी वाघेला यानं घरी येऊन चाकूनं हल्ला केल्याची तक्रार नोंदवली आहे. 

मुलगा काहीच काम करत नसल्यानं आईनं आपल्या लेकाला संतापून काहीतरी कामधंदा कर असं म्हटलं. याचाच राग मुलाला आला आणि त्यानं आईशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद इतका विकोपाला गेला की मुलानं चक्क आपल्याच आईवर चाकूनं वार केला. त्यानंतर तो तिथून पळून गेला. घरातून पळ काढताना त्यानं घरातील इतर सदस्यांनाही मारण्याची धमकी दिली. मला पुन्हा जर काम करण्यास सांगितलं तर सर्वांचा जीव घेईन अशी धमकीच त्यानं दिली. जखमी गोमती बेन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आईवर जीवघेणा हल्ला आणि घरातील सदस्यांना जीवे मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 

आई-वडिल ओरडल्यानं त्यांच्यावरच जीवघेणा हल्ला करण्याचं प्रमाण हल्ली वाढलं आहे. यातील क्रूरतेचं टोक म्हणजे लखनौमध्ये नुकतंच एका मुलानं आई पबजी गेम खेळू देत नाही म्हणून तिला जीवे मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. मुलानं चक्क गोळी झाडून आपल्याच आईची हत्या केली. याप्रकरणानं संपूर्ण देश हादरला आहे. देशात दिवसेंदिवस असे धक्कादायक प्रकार समोर येत असल्यानं चिंता व्यक्त केली आहे. 

Web Title: gujarat kutch jobless son attack on his mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.