वाद टोकाला गेल्यानं पत्नीचा खून केला; मृतदेह सोबत घेऊन 'तो' स्कूटरवरून १० किलोमीटर फिरला

By कुणाल गवाणकर | Published: November 2, 2020 04:20 PM2020-11-02T16:20:57+5:302020-11-02T16:26:15+5:30

खून करणाऱ्या पतीला पोलिसांकडून अटक; इतर कुटुंबीयांची चौकशी सुरू

Gujarat man kills wife ferries her body on scooter for 10 kilometres | वाद टोकाला गेल्यानं पत्नीचा खून केला; मृतदेह सोबत घेऊन 'तो' स्कूटरवरून १० किलोमीटर फिरला

वाद टोकाला गेल्यानं पत्नीचा खून केला; मृतदेह सोबत घेऊन 'तो' स्कूटरवरून १० किलोमीटर फिरला

Next

राजकोट: पत्नीचा खूप करून तिचा मृतदेह स्कूटरवर घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. गुजरातच्या राजकोटमधील पालिटाना भागात हा धक्कादायक प्रकार घडला. एक व्यक्ती दिवसाउजेडी आपल्या पत्नीचा मृतदेह स्कूटरवरून नेत होती. ही घटना पाहून अनेकांना धक्का बसला. अमित हेमनानी असं या व्यक्तीचं नाव असून पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. काही स्थानिकांनी अमितला मृतदेह स्कूटरवरून नेताना पाहिलं. त्यांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर अमितला अटक करण्यात आली.

सरकारी नोकरी मिळाल्यानं तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

अमित आणि त्याची पत्नी पत्नी सिंधी कॅम्प वसाहतीत राहतात. त्या दोघांमध्ये रविवारी वाद झाला. तो टोकाला गेल्यावर अमितनं नैनाचा गळा आवळून खून केला. वर्षभरापूर्वीच या दोघांचा विवाह झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. नैनाचा खून केल्यानंतर अमितनं तिचा मृतदेह स्कटूरच्या फूटरेस्टवर ठेवला. त्यानंतर तो सिंधी कॅम्प वसाहतीमधून निघाला. पोलिसांनी अटक करण्यापूर्वी त्यानं जवळपास १० किलोमीटर अंतर कापलं होतं.

भयंकर! टोमण्यांना कंटाळून कोरोना वॉरियरची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं...

मृतदेह स्कूटरवरून नेत असताना अनेकांनी अमितला पाहिलं. त्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून गेला. त्यानंतर काहींनी अमितचा वाहनांमधून पाठलाग केला आणि त्याला पकडलं. यानंतर पोलिसांनी अमितची चौकशी केली. आपण मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जात असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. रोहिशाला गावाबाहेर असलेल्या जंगलात नेऊन बायकोच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आपण आखली होती, अशी कबुली त्यानं पोलिसांकडे दिली.

अमितनं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पालिटाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक एन. एम. चौधरींनी दिली. 'अमितची कोरोना चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. तो सध्या अटकेत आहे. अमित आणि नैनाची कुटुंबीयांची चौकशी सध्या सुरू आहे. हत्येमागील कारणांचा तपास सुरू आहे,' असं चौधरी म्हणाले.

Web Title: Gujarat man kills wife ferries her body on scooter for 10 kilometres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून