कामातून गेला! मोठ्या हौसेने लग्न केलं, बायको डॉन निघाली; गुजरातचा तरुण नाव सर्च करताच उडाला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 01:50 PM2023-02-16T13:50:47+5:302023-02-16T13:51:14+5:30

लग्नानंतर काही महिन्यांनी ज्या महिलेशी लग्न झालं होते ती कोणी सामान्य स्त्री नसून हिस्ट्रीशीटर आणि डॉन असल्याचं समोर आलं आहे.

gujarat man searched wife through matrimonial sites after marriage found don and history sheeter | कामातून गेला! मोठ्या हौसेने लग्न केलं, बायको डॉन निघाली; गुजरातचा तरुण नाव सर्च करताच उडाला

कामातून गेला! मोठ्या हौसेने लग्न केलं, बायको डॉन निघाली; गुजरातचा तरुण नाव सर्च करताच उडाला

googlenewsNext

गुजरातमधील पोरबंदरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. सुंदर आणि चांगली पत्नी शोधण्यासाठी एका तरुणाने मॅट्रिमोनियल वेबसाईटची मदत घेतली. वेबसाईटच्या माध्यमातून दोघांची भेट झाली आणि लग्न झाले. लग्नानंतर काही महिन्यांनी तो ज्या महिलेशी विवाहबद्ध झाला होता ती कोणी सामान्य स्त्री नसून हिस्ट्रीशीटर आणि डॉन असल्याचं समोर आलं आहे. हा धक्कादायक प्रकार कळताच तरुणाचे पोरबंदर पोलिसांत तक्रार दिली आहे.

तरुणाने इंटरनेटवर तिच्याबद्दल अधिक माहिती शोधली असता तिचे गुन्हे समोर आले आहेत. पत्नी बनलेल्या महिलेने पाच हजार कार घेतल्याचं समोर आलं. ती एक डॉन आहे. पत्नीचे भयंकर वास्तव समोर आल्यानंतर आता पतीने पोरबंदरच्या एसपींना अर्ज दिला आहे. महिलेच्या गुन्हेगारी इतिहासाबद्दल बोलताना, रिटाचे नाव गुगलमध्ये टाइप करताच, एक गुन्हेगारी प्रोफाइल समोर आले. 

लग्नानंतर पत्नी निघाली डॉन

गुन्ह्यांच्या नोंदीमध्ये तिचे नाव चोरी, दरोडा, गेंड्याची शिकार, तस्करी, शस्त्रास्त्र प्रकरणांसह अनेक मोठ्या गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे आढळून आले. तरुणाने गुवाहाटी पोलिसांची केस गुगलवर सर्च केली असता, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कार चोरीच्या प्रकरणात त्याच्या पत्नीचे नाव पुढे आले. या संपूर्ण घटनेनंतर तरुणाने पत्नीला फोन करून याबाबत जाब विचारला. 

पतीचा नंबर केला ब्लॉक 

तू माझ्यासोबत असं वाईट का केलंस, तेव्हा तिने संतापून सांगितले की, जे व्हायचं होतं ते झालं. यानंतर पतीचा फोन कट करून नंबर ब्लॉक करण्यात आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणाची प्रकृती बिघडली आहे. ऑनलाइन मुलगी शोधणं हे याचं मूळ असल्याचं  कुटुंबीयांनी म्हटलं आहे. पोरबंदरमधील महाराजबाग परिसरातील जलाराम कुटीर येथील रहिवासी विमल तुलसीदास करिया यांच्या तक्रारीवरून पोलीस तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: gujarat man searched wife through matrimonial sites after marriage found don and history sheeter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.