रॅगिंग केव्हा थांबणार? प्रायव्हेट पार्टमध्ये टूथब्रश, सॅनिटायझर टाकले; व्हिडिओ रेकॉर्ड करुन शोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 06:16 PM2022-10-22T18:16:53+5:302022-10-22T18:17:11+5:30
गुजरातमधील राजकोटमध्ये रॅगिंगचं एक धक्कादायक एक प्रकरण समोर आलं आहे. येथील एका खासगी विद्यापीठात पाच विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याचा अंघोळ करताना व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले.
गुजरातमधील राजकोटमध्ये रॅगिंगचं एक धक्कादायक एक प्रकरण समोर आलं आहे. येथील एका खासगी विद्यापीठात पाच विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याचा अंघोळ करताना व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले. पीडिताच्या म्हणण्यानुसार, या विद्यार्थ्यांनी ताच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. एवढेच नाही तर त्यांने क्रूरतेची हद्दच ओलांडली आणि ज्युनिअरच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सॅनिटायझर, मध, टूथब्रश आणि पेन्सिलही टाकली. तसेच प्रायव्हेट पार्ट कापून टाकण्याची धमकी दिली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाच आरोपी विद्यार्थ्यांपैकी एक अल्पवयीन आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच पीडित विद्यार्थ्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पीडिताच्या वडिलांनी राजकोटमधील कुवाडवा रोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी पीडित मुलाने आपल्या मोठ्या बहिणीला हॉस्टेलमध्ये न राहण्याची इच्छा बोलून दाखवली होती. यादरम्यान तो फोनवर ढसाढसा रडत होता. यावर बहिणीने तत्काळ वडिलांना फोन करून ही माहिती दिली. यानंतर बहीण आणि वडील ताबडतोब त्याची भेट घेण्यासाठी हॉस्टेलमध्ये भेटायला गेले होते.
कुटुंबीयांना पाहून तो खूप रडला
पीडित विद्यार्थ्याला आपल्या कुटुंबीयांना पाहून रडूच कोसळले आणि त्याने आपली व्यथा मांडली. जी ऐकून कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला. पीडिताने सांगितलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात तो आंघोळ करत असताना तीन विद्यार्थ्यांनी त्याचा न्यूड व्हिडिओ बनवला होता. यानंतर त्यांनी त्यांचे म्हणणे न ऐकल्यास त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी दिली होती.
प्रायव्हेट पार्ट कापण्याची धमकी
आरोपींनी पीडिताला तीन पर्याय दिले होते. पहिला म्हणजे एक तर त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकावा, दुसरा कान कापावा किंवा तिसरा पर्याय म्हणून त्याने वसतिगृहाच्या छतावरून उडी मारावी. हे ऐकून विद्यार्थी घाबरला तेव्हा आरोपींनी त्याला आणखी एक पर्याय दिला. तो म्हणजे त्यांना जे मनाला वाटेल ते करु द्यावं.
विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध
पीडित विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी त्याला त्रास देण्यास सुरुवात केली आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले. आरोपींनी पीडित विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सॅनिटायझर, मध आणि पावडर देखील लावली. नराधम इथंच थांबले नाहीत तर त्यांनी प्रायव्हेट पार्टमध्ये पेन्सिल आणि टूथब्रशही टाकला. तासनतास आरोपी विद्यार्थ्यांनी त्याचा छळ केला. सध्या या प्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच आरोपींपैकी तीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर पीडित विद्यार्थिनीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.