बापरे! कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी रेस्टॉरंट मालकाचं निर्दयी कृत्य; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 09:50 PM2022-04-04T21:50:20+5:302022-04-04T21:50:52+5:30

Salary increment demand turns into kidnapping plot : गांधीनगर गुन्हे शाखेने या प्रकरणात महिला शिक्षिकेच्या 35 वर्षीय शेजारी मितुल पटेल याला अटक केली आहे.

Gujarat: Salary increment demand turns into kidnapping plot in Gandhinagar | बापरे! कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी रेस्टॉरंट मालकाचं निर्दयी कृत्य; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बापरे! कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी रेस्टॉरंट मालकाचं निर्दयी कृत्य; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

googlenewsNext

अहमदाबाद - गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यात अपहरणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला. येथील कलोल भागात पंचवटी स्थित सरस्वती सहकारी समितीत अपहरणाची घटना घडली. एक व्यक्ती सोलर पॅनलमध्ये मीटर रीडिंगचं कारण सांगून महिला शिक्षिकेच्या घरी आला. नंतर संधी साधून अन्य मुले देखील महिला शिक्षिकेच्या घरात घुसले. त्यांनी महिलेच्या तोंडावर टेप चिकटवलं आणि हात-पाय बांधले आणि सांगितलं तुझं अपहरण झालं आहे. 

गांधीनगर गुन्हे शाखेने या प्रकरणात महिला शिक्षिकेच्या 35 वर्षीय शेजारी मितुल पटेल याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मितुल पटेल याने 30 मार्च रोजी वेतन वाढवण्याची मागणी करणाऱ्या आपल्या 4 कर्मचारी आणि अन्य तिघांसोबत मिळून शेजारी राहणाऱ्या महिला शिक्षकाच्या अपहरणाची कट आखला. पीडित महिला शिक्षिका (56) अलका रस्तोगी तपोवन सर्कलजवळ एका शाळेत नोकरी करते. पोलिसांनी घटनाक्रमाचा खुलासा करताना सांगितलं की, बुधवारी दुपारी ती आपल्या सरस्वती सोसायटी स्थित घरात एकटी होती. त्यावेळी सौरभ कुमार नावाच्या तरुणाचं नाव समोर आलं आहे. त्यानेच दार ठोठावलं. जेव्हा अलकाने दार उघडले तर सौरभने सांगितले की, तो सोलर पॅनलची मीटर रीडिंग घेण्यासाठी आला आहे. महिला शिक्षकाने तेव्हा मुलाला आत घेतले. यानंतर अन्य सातजण देखील अलका रस्तोगीच्या घरात घुसले आणि तिचं अपहरण केलं.

आरोपींनी शिक्षिकेला जबरदस्तीने एका गाडीत बसवलं आणि तिचं तोंड टेपने बांधलं. काही वेळ गाडी चालवल्यानंतर आरोपींनी महिलेचा पती प्रदीप रस्तोगी याला फोन केला. प्रदीप रस्तोगी चतरालमध्ये फॅक्टरी चालवतात. त्यांनी कॉल रिसीव्ह केला नाही आणि कॉल बॅकदेखील केला नाही. प्रदीप रस्तोगी घरी आले आणि पत्नी दिसली नाही हे पाहून त्याने पोलिसांनी संपर्क केला आणि पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांमध्ये तक्रार केल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या रेस्टॉरंट मालक मितुल पटेल याला कळताच तो घाबरला आणि 31 मार्चच्या सकाळी साधारण 4.30 वाजता आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शिक्षिकेला निर्जनस्थळी सोडून फरार झाला. यानंतर शिक्षिका अलकाने आपला पती प्रदीपशी संपर्क केला. यानंतर दाम्पत्याने मिळून पोलिसात अपहरण केल्याची तक्रार दाखल केली. अपहरणासाठी वापरण्यात आलेली गाडी शेजारी मितुल पटेल याची होती. 

चौकशीत पटेलने आपला गुन्हा कबुल केला असून त्याने पोलिसांना सांगितलं की, त्यांच्या रेस्टॉरंटमधील वेटर निलेश, देवेंद्र, बल्लू आणि सौरभच्या मदतीने हा गुन्हा करण्यात आला. मितुल पटेलच्या रेस्टॉरंट स्टाफने 23 मार्च रोजी त्यांच्याकडून पगार वाढीची मागणी केली होती. पटेलने आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की, तो एक गंभीर आर्थिक संकटात अडकला आहे आणि यातून बाहेर पडण्याचा शोध घेत होती. यानंतर वेटर निलेशने हा अपहरणाचा कट आखला होता.

Web Title: Gujarat: Salary increment demand turns into kidnapping plot in Gandhinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.