ऑस्ट्रेलियात गुजराती युवकाची चाकू भोसकून हत्या; रुममेटवर आरोप, नेमका काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 14:16 IST2025-04-09T14:16:35+5:302025-04-09T14:16:53+5:30
मिहीर देसाई याच्या हत्येनंतर मेलबर्नच्या स्थानिक गुजराती समाजात शोक पसरला आहे. गुजरातच्या बिलिमोरा येथे राहणाऱ्या त्याच्या कुटुंबालाही मिहीरच्या हत्येने धक्का बसला

ऑस्ट्रेलियात गुजराती युवकाची चाकू भोसकून हत्या; रुममेटवर आरोप, नेमका काय घडलं?
नुकतेच ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे भारतीय युवकाची चाकू भोसकून हत्या केल्याचे समोर आले आहे. या युवकाच्या हत्येची बातमी मिळताच कुटुंबात शोककळा पसरली. मृत युवक हा भारतातील गुजरातचा असून मिहीर देसाई असं त्याचं नाव आहे.
मिहिर देसाई हा मेलबर्नच्या बरवुड परिसरात राहत होता. तो मूळचा गुजरातच्या बिलिमोरा, नवसारी भागातील रहिवासी आहे. मिहीरचा खून त्याच्याच रुममेटने केल्याचे उघड झाले. ही हत्या करण्यामागचे कारण काय याचा अद्याप खुलासा झाला नाही. घटनास्थळी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली तेव्हा मिहीर मृतावस्थेत होता. त्याच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या. या प्रकरणी तातडीने पोलिसांनी कारवाई करत त्याच्या घराशेजारील एका ४२ वर्षीय भारतीय व्यक्तीला अटक केली आहे.
पोलीस तपासात काय आढळलं?
या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला, त्यात आरोपी आणि मृतक एकमेकांना आधीपासून ओळखत होते. ते दोघे रूममेट म्हणून एकाच खोलीत राहायचे हे कळलं आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावर पुरावे जमा केला. शेजाऱ्यांचीही चौकशी केली. या दोघांमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाला होता त्याबाबत पोलीस अधिक माहिती गोळा करत आहेत.
मिहीर देसाई याच्या हत्येनंतर मेलबर्नच्या स्थानिक गुजराती समाजात शोक पसरला आहे. गुजरातच्या बिलिमोरा येथे राहणाऱ्या त्याच्या कुटुंबालाही मिहीरच्या हत्येने धक्का बसला. मेलबर्न पोलीस या घटनेचा तपास करत आहे. दरम्यान, याआधीही ऑस्ट्रेलियात काही भारतीय विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या झटापटीत २२ वर्षीय एमटेकच्या विद्यार्थ्याचा चाकू भोसकून खून करण्यात आला होता. या मृतकाचे नाव नवजित संधू असं होते. तो हरियाणाच्या करनाल येथे राहणारा होता.