रत्नागिरीच्या समुद्रात गुजरातची बोट बुडाली; दोन खलाशांचा मृत्यू, एक बेपत्ता

By अरुण आडिवरेकर | Published: January 4, 2023 03:34 PM2023-01-04T15:34:46+5:302023-01-04T15:35:37+5:30

कोस्टगार्डकडून युद्धपातळीवर बचाव कार्य करण्यात आले. बोटीवर नऊजण असल्याची माहिती समोर येत आहे.

Gujarat's boat sank in Ratnagiri sea; Two sailors dead, one missing | रत्नागिरीच्या समुद्रात गुजरातची बोट बुडाली; दोन खलाशांचा मृत्यू, एक बेपत्ता

रत्नागिरीच्या समुद्रात गुजरातची बोट बुडाली; दोन खलाशांचा मृत्यू, एक बेपत्ता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
रत्नागिरी : गुजरात येथील मच्छिमारी नौका रत्नागिरीतील जयगड जवळच्या समुद्रात बुडाल्याची घटना घडली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, एकजण बेपत्ता आहे या नौकेतील बचावलेल्या आणि मृत्यू झालेल्या खलाशांना घेऊन कोस्टगार्डचे अधिकारी मिरकरवाडा बंदरात दाखल झाले आहेत. 

 जयगडपासून १२० नॉटिकल माईल क्षेत्राबाहेर ही घटना घडली आहे. ही घटना घडताच कोस्टगार्डकडून युद्धपातळीवर बचाव कार्य करण्यात आले. बोटीवर नऊजण असल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी दोन खलाशांचा मृत्यू झाला असून, एकजण बेपत्ता झाला आहे. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने आणि बोटीच्या सहाय्याने मदतकार्य करण्यात आले. बुडलेल्यांपैकी चारजणांना वाचवण्यात यश आले आहे.

Web Title: Gujarat's boat sank in Ratnagiri sea; Two sailors dead, one missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.