गुजरातची गॅंगच्या मुसक्या आवळल्या; ८० वर्षाच्या म्होरक्यालाही NCB ने ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 09:32 PM2021-09-15T21:32:34+5:302021-09-15T21:33:12+5:30
NCB Action : गुजरातमधील ड्रग्स पेडलरला ही अटक केली आहे. या गॅंगच्या एकूण सात जणांना अटक केली आहे.
एनसीबीने कारवाई करून गुजरात राज्यातील एक मोठी ड्रग्स विकणारी गॅंग उध्वस्त केली केली. या गॅंगचा म्होरक्या ८० वर्षाचा आहेत. त्यालाही अटक केली आहे. गुजरातमधील ड्रग्स पेडलरला ही अटक केली आहे. या गॅंगच्या एकूण सात जणांना अटक केली आहे.
एनसीबीच्या अधिकाऱ्यांना एक महत्वाची माहिती मिळाली होती. ड्रग्स माफियांची एक गॅंग महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात सक्रिय असल्याची ही माहिती होती. त्यानुसार एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी अनेक टीम बनवून कारवाईस सुरुवात केली. अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. मुंबई, ठाणे, मीरा रोड आदी ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सात जणांना अटक केली. त्याचप्रमाणे या गॅंगकडून चार किलो अफेड्रींन आणि दोन किलो एमडी हे ड्रग्स अस एकूण सहा किलो ड्रग्स जप्त केलं आहे. गुजरात राज्यातील मोरबी येथील गँगवरही कारवाई करण्यात आली आहे. या गँगचा म्होरक्या इरफान परमार याला अटक करण्यात आली आहे. इरफान हा मीरारोड येथे यायचा आणि ड्रग्स घेऊन जायचा. तो ड्रग्स घायला आला असता त्याला ही अटक करण्यात आली आहे.
एनसीबीने आणखी ही दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत. एक कारवाई गोरेगाव येथे केली आहे. या कारवाईत एका एमडी ड्रग्स सप्लायरला अटक करण्यात आली आहे. तर तिसऱ्या कारवाईत अनेक वर्षा पासून फरार असलेल्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. विजय कुमार उर्फ रेहान चिकन आणि जयप्रकाश भट्ट उर्फ जितू यांना अटक करण्यात आली आहे.