सोमनाथ मंदिराबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्याला अटक होताच मागितली माफी, म्हणाला.....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 01:59 PM2021-03-18T13:59:22+5:302021-03-18T14:01:23+5:30
Trending Viral News in Marathi : मोहम्मद बिन कासिमचे कौतुक केल्याप्रकरणी आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्यामुळे एका अज्ञान व्यक्तीवर प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली होती.
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सोमनाथ मंदिराबाबच्या वक्तव्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत होता. लूटमार करणाऱ्या महमूद गजनीचे आणि अरब राजा मोहम्मद बिन कासिमचे कौतुक केल्याप्रकरणी आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्यामुळे एका अज्ञान व्यक्तीवर प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली होती.
गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यातील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरापासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर उभं राहून हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये दोषी व्यक्तीनं महमूद गजनीने मंदिरांमध्ये केलेल्या लूटमारीच्या घटनांचा उल्लेख केला होता. याशिवाय बिन कासिमची प्रशंसासुद्धा केली होती.
पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली
सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार समोर आल्यानंतर सोमनाथ मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक विजयसिंह चवडा यांनी सोमवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आपीसी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गिर सोमनाथचे पोलिस अधिक्षक राहुल त्रिपाठी म्हणाले की, प्राथमिक तपासणीत हा व्हिडिओ बाहेरगावाहून सोमनाथ येथे आलेल्या एका व्यक्तीने काढला होता, असे उघडकीस आले आहे.
संतापजनक! जाडी अन् सावळी असल्याचं कारण देत पत्नीला सोडलं; गर्लफ्रेंडशी तुलना करत म्हणायचा.
सोशल मीडियावर गझनीचं कौतुक करणाऱ्या एका व्हिडिओनंतर या माणसाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर यूट्यूबने आणखी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये दोषी व्यक्ती माफी मागताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने म्हटले आहे की, ''मी ४ मे २०१९ रोजी गुजरातच्या सोमनाथ येथे फिरायला गेलो होतो. तिथे आम्ही एक छोटा व्हिडिओ शूट केला ज्यात सोमनाथांची स्तुती करण्याच्या प्रयत्न केला जात होता. तथापि, या व्हिडिओमुळे कोणत्याही भारतीयांसह गुजराती बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.'' बोंबला ! वरात आली, लोक जेवले झिंगाट नाचले अन् ऐनवेळी नवरीने लग्नास दिला नकार, कारण!