बहिणीच्या लग्नाच्या 14 दिवसांनंतर मेहुण्याने भाओजीची केली हत्या, धारदार शस्त्राने केलेत 30 वार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 10:41 AM2022-07-30T10:41:00+5:302022-07-30T10:41:05+5:30

Crime News : एसीपी प्रीतपाल सिंह यांनी सांगितलं की, मृत व्यक्तीच्या लग्नाला केवळ 14 दिवस झाले होते. यादरम्यान मेहुण्याने धारदार शस्त्राने भाओजीवर 25 ते 30 वार करत त्याची हत्या केली.

Gurugram brother in law commits brutal murder sister husband | बहिणीच्या लग्नाच्या 14 दिवसांनंतर मेहुण्याने भाओजीची केली हत्या, धारदार शस्त्राने केलेत 30 वार

बहिणीच्या लग्नाच्या 14 दिवसांनंतर मेहुण्याने भाओजीची केली हत्या, धारदार शस्त्राने केलेत 30 वार

googlenewsNext

Crime News :  हरयाणाच्या (Haryana) गुरूग्राममध्ये (Gurugram) एका तरूणाने आपल्या दोन मित्रांसोबत मिळून आपल्या भाओजीची हत्या केली. आरोपीच्या बहिणीचं लग्न 14 जुलै 2022 ला झालं होतं. भाओजी दारू पिऊन पत्नी म्हणजे आरोपीच्या बहिणीला मारहाण करत होता. यावरून नाराज झालेल्या मेहुण्याने भाओजीची हत्या केली. क्राइम ब्रांचने 27 जुलैला हत्येप्रकरणी आरोपीला आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली.

पोलिसांनुसार, 14 जुलैला झालेल्या लग्नानंतर चौकीदार म्हणून काम करणारा भूरा दारू पिऊन आपल्या पत्नीला मारहाण करू लागला होता. याची माहिती मेहुणा सुरजीत उर्फ बिट्टूला लागली. त्याने भाओजीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावर भूरा म्हणाला की, 'ती माझी पत्नी आहे, तिला मी कसाही ठेवणार, तुला काय कराचंय'. हे ऐकून सुरजीत आणखी संतापला आणि त्याने दोन मित्रांसोबत मिळून भाओजी भूराची हत्या केली.

एसीपी क्राइमनुसार, 27 जुलैला रात्री उशीरा भूराची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेरांच्या मदतीने काही संशयीतांची ओळख पटली. क्राइम यूनिट सेक्टर-40 ने या ब्लाइंड मर्डर केसमध्ये तीन आरोपींना अटक करून या प्रकरणाचा खुलासा केला.

एसीपी प्रीतपाल सिंह यांनी सांगितलं की, मृत व्यक्तीच्या लग्नाला केवळ 14 दिवस झाले होते. यादरम्यान मेहुण्याने धारदार शस्त्राने भाओजीवर 25 ते 30 वार करत त्याची हत्या केली. क्राइम ब्रांच या प्रकरणाची चौकशी करत आहे.

Web Title: Gurugram brother in law commits brutal murder sister husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.