दोन बायकांमध्ये फसला पती, एका पत्नीवर गोळी झाडून स्वत: केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 11:15 AM2022-01-22T11:15:49+5:302022-01-22T11:16:32+5:30
Gurugram Crime New : तो एका पत्नीला पुन्हाना तर दुसऱ्या पत्नीला नूहमध्ये भाड्याच्या घरात ठेवत होता. पोलिसांनुसार, सुरूवातीच्या चौकशीतून कौटुंबिक वाद समोर आला आहे.
गुरूग्रामच्या (Gurugram Crime New) मेवातच्या नूह भागात एका तरूणाच्या संशयास्पद मृत्यूची घटना समोर आली आहे. तरूणाचं नाव जनैद आहे. असा अंदाज आहे की, कौटुंबिक वादातून जुनैदने आधी पत्नी आलिया (दुसरी पत्नी) वर गोळी झाडली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पत्नीची स्थिती गंभीर असून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. असं सांगितलं जात आहे की, जुनैदला दोन बायका आहेत. तो एका पत्नीला पुन्हाना तर दुसऱ्या पत्नीला नूहमध्ये भाड्याच्या घरात ठेवत होता. पोलिसांनुसार, सुरूवातीच्या चौकशीतून कौटुंबिक वाद समोर आला आहे.
मेवात पोलिसांना सूचना मिळाली होती की, एका तरूणाचा मृतदेह कारमध्ये पडून आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तर तो पुन्हानाचा राहणारा जुनैद असल्याचं समोर आलं. स्थानिक लोकांनी पोलिसांना सांगितलं की, कारमध्ये एक महिलाही होती. तिलाही गोळी लागली आहे. तिला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिची स्थिती गंभीर असून तिला दिल्लीला रेफर करण्यात आलं आहे. मेवातचे डीएसपींनी सांगितलं की, पोलिसांनी मृतदेह आणि कार ताब्यात घेऊन प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
स्थानिक लोकांनुसार, जुनैद आणि त्याची दुसरी पत्नी आलियामधे कौटुंबिक वाद सुरू होता. दोघांमध्ये इतका वाद वाढला होता की, जुनैदने आधी पत्नी आलियावर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी मेवात पोलिसांचं मत आहे की, चौकशी अजून सुरू आहे आणि लवकरच प्रकरणाचा खुलासा केला जाईल.
स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुनैदला दोन पत्नी आहेत. एक तिच्या घरी पुन्हानामध्ये राहते आणि दुसरी पत्नी आलियाला त्याने नूहच्या वार्ड नंबर ८ च्या भाड्याच्या घरात ठेवलं होतं. दोघांमध्ये कोणत्या कारणावरून वाद होता याचा खुलासा होऊ शकला नाही.