Gutka Seized : भिवंडीत २१ लाखांचा गुटखा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 20:40 IST2021-11-02T20:39:38+5:302021-11-02T20:40:01+5:30
Gutka Seized : मंगळवारी न्यायालयात हजर केले असता ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक पराग भाट हे करीत आहेत.

Gutka Seized : भिवंडीत २१ लाखांचा गुटखा जप्त
भिवंडी - भिवंडीत २१ लाखांच्या गुटख्यासह गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो असा सुमारे २९ लाख ८५ हजार ९२० मुद्देमाल कोनगाव पोलिसांनी सोमवारी जप्त केला आहे.
पिंपळास येथील आर. के. जी गोडाऊन येथुन घेवून जाण्यासाठी एक आयसर टेम्पो येणार आहे अशी खात्रीशीर माहिती कोनगाव पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभाग कोकण विभाग यांचे कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी माणिक जाधव व सहकाऱ्यांनी कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाने कोनगाव पोलिसांनी आर के जी गोडाऊन येथे धाड टाकली असता टेम्पोची झाडाझडती घेतली असता टेम्पोत २१ लाख ८५ हजार ९२० रुपये किंमतीचा विना लेबल प्लॅस्टीकची एकुण ४७ मोठी पोती, त्यामध्ये केसरयुक्त प्रिमीयम क्वॉलिटीचे एकुण १५,१८० प्रतिबंधीत गुटख्याचे पॅकेट व ८ लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो असा एकूण २९ लाख ८५ हजार ९२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून टेम्पोचालक महादेव हनुमंत भोसले ( वय ४२ ) यास अटक केली आहे. त्यास मंगळवारी न्यायालयात हजर केले असता ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक पराग भाट हे करीत आहेत.