चोपडा येथे साडेसहा लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 10:48 PM2021-02-04T22:48:05+5:302021-02-04T22:48:11+5:30
अमीन शेख फय्याज (वय-५५) असे या गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांचे नाव आहे.
Next
जळगाव: अडावद ता.चोपडा येथील केजीएन नगरातील एका घरात छापा टाकून तब्बल ६ लाख ७१ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. गुरुवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास अन्न व औषध प्रशासन व पोलिसांनी ही कारवाई केली. यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमीन शेख फय्याज (वय-५५) असे या गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांचे नाव आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी सुवर्णा देवीदास महाजन, किशोर साळुंखे यांनी तसेच अडावद पोलीस स्टेशनचे सपोनि योगेश तांदळे, उपनिरीक्षक गोकुळसिंग बयास, यादव भदाणे, नसिर तडवी, योगेश गोसावी, संजय तडवी, माधुरी जगताप यांनी हा छापा टाकला.