काशीमीरा भागात १३ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2023 08:19 PM2023-07-30T20:19:11+5:302023-07-30T20:19:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क  मीरारोड -  काशीमीरा भागात गुटख्याची तस्करी करणारा टेम्पो सह १२ लाख ८७ हजारांचा गुटखा साठा जप्त ...

Gutkha worth 13 lakhs seized in Kashmiri area | काशीमीरा भागात १३ लाखांचा गुटखा जप्त

काशीमीरा भागात १३ लाखांचा गुटखा जप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड -  काशीमीरा भागात गुटख्याची तस्करी करणारा टेम्पो सह १२ लाख ८७ हजारांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे . पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी चालक पळून गेला आहे . 

काशीमीरा भागात गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती हरीश शेट्टी यांना मिळाली असता त्यांनी एका टेम्पोत गुटख्याचा साठा भरला जात असताना तो टेम्पो पोलिसांना पकडून दिला . या दरम्यान टेम्पोचा चालक पळून गेला . काशीमीरा पोलिसांनी टेम्पो व त्यातील गुटख्याचा साठा जप्त केला आहे . 

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे .  इतक्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत असताना अन्न व औषध प्रशासना सह पोलिसांना याची कुणकुण न लागल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे . सदर गुटखा हा गुजरात राज्यातून आणला जातो व मुंबई , ठाणे , पालघर आदी जिल्ह्यात वितरित केला जात असल्याचा संशय आहे . 

Web Title: Gutkha worth 13 lakhs seized in Kashmiri area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.