अरेरे! 15 दिवसांत प्रेम, 16 व्या दिवशी लग्न अन् 20 दिवसांचा संसार; पतीसह सासूही थेट तुरुंगात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 01:08 PM2022-07-31T13:08:43+5:302022-07-31T13:09:24+5:30
वर्षभरापूर्वी दिल्लीत एका लग्न समारंभात दोघांची भेट झाली होती. यानंतर 15 दिवसांतच दोघे प्रेमात पडले. मात्र, त्यानंतर जे घडले ते वाचून तुम्हीही हैराण व्हाल.
नवी दिल्ली - एका अजब प्रेमाची गजब गोष्ट आता समोर आली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील एक मुलगा आणि पंजाबमधील एका मुलीमध्ये सुरू झालेल्या प्रेमाचं रुपांतर लवकरच ब्रेकअपमध्ये झाले. वर्षभरापूर्वी दिल्लीत एका लग्न समारंभात दोघांची भेट झाली होती. यानंतर 15 दिवसांतच दोघे प्रेमात पडले. मात्र, त्यानंतर जे घडले ते वाचून तुम्हीही हैराण व्हाल. एकमेकांशी ओळख झाल्यानंतर 15 दिवसांतच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर 16 व्या दिवशीच दोघांचे लग्न झाले.
लग्न झाल्यावर नवीन सून ग्वाल्हेरला आली आणि अवघ्या 20 दिवस पतीसोबत राहून पंजाबला परतली. कारण मैत्री, प्रेम आणि लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये रोज भांडणंस वाद सुरू झाले. 20 दिवसांत माहेरच्या घरी जाणारी सून वर्षभरापासून पंजाबमध्ये आहे. आता पंजाबमध्ये हुंडा कायद्याबाबत सुनेने पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा पंजाब पोलिसांनी ग्वाल्हेरमध्ये कारवाई करत सुनेच्या तक्रारीवरून सासूला अटक केली आहे. तर तिच्या पतीला आधीच अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव सिंह नावाचा तरुण व्यसनमुक्ती केंद्र चालवतो. तो ग्वाल्हेरच्या पडव पोलीस स्टेशन हद्दीतील कांती नगरमध्ये राहतो. गौरवची दिल्लीत पूनम नावाच्या मुलीशी एक वर्षापूर्वी भेट झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीनंतर दोघांनी 16 व्या दिवशी लग्न केले. ही तरुणी ग्वाल्हेरमध्ये गौरव सिंहसोबत राहू लागली. त्याचे कुटुंबही गौरवसोबत राहते. मात्र, लग्नाच्या 20 दिवसातच पूनम पंजाबमध्ये तिच्या माहेरी गेली.
गौरवने अनेक वेळा तिला घरी येण्याबाबत विनंती केली मात्र, गौरवने समजावल्यानंतरही तिने येण्यास नकार दिला. तर दुसरीकडे गौरव दुसऱ्या एका प्रकरणात तुरुंगात आहे. त्याचवेळी, पूनमने पती गौरव आणि सासूविरुद्ध हुंडा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पंजाब पोलिसांनी गौरवच्या आईला अटक करून पंजाबला नेले आहे. हुंड्यासाठी त्रास देत असल्याने पूनमने पोलिसांत धाव घेतल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.