जिममध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी जिम मालकाला केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 21:16 IST2022-01-02T21:16:02+5:302022-01-02T21:16:22+5:30
Gangrape on women in gym :

जिममध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी जिम मालकाला केली अटक
नवी दिल्ली - उत्तर-पश्चिम दिल्लीतील बुद्ध विहार फेज-1 भागात एका 21 वर्षीय महिलेवर तीन नराधमांनी बलात्कार केला. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका आरोपीच्या कारखान्यात काम करते.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना गुरुवारी एका जिममध्ये घडली. या घटनेसंदर्भात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
:महिलांची बदनामी करणाऱ्या बुल्ली बाई ॲप बनविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होतं सेक्स रॅकेट, आक्षेपार्ह स्थितीत आढळल्या महिला
फॅक्टरी मालक उमेश आणि जिम मालक सुनील कुमार वत्स या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तिसरा अल्पवयीन असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.