दिवसा जिम ट्रेनर तर रात्री दरोडेखोर;युवकांना व्यायामाचे धडे देऊन रात्री करायचे घरफोड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 09:13 PM2021-02-23T21:13:12+5:302021-02-23T21:13:51+5:30

Dacoity : भिवंडीत घरफोडी व दरोडा प्रकरणी नऊ आरोपींना अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश

Gym trainers during the day and robbers at night; burglary | दिवसा जिम ट्रेनर तर रात्री दरोडेखोर;युवकांना व्यायामाचे धडे देऊन रात्री करायचे घरफोड्या

दिवसा जिम ट्रेनर तर रात्री दरोडेखोर;युवकांना व्यायामाचे धडे देऊन रात्री करायचे घरफोड्या

Next
ठळक मुद्दे विशेष म्हणजे या गुन्ह्यातील तीन आरोपी हे जिम ट्रेनर असून दिवसा युवकांना व्यायामाचे प्रशिक्षण देऊन रात्री घरफोड्या करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

भिवंडी शहरात दिवसा जिममध्ये व्यायामाचे धडे देऊन रात्रीच्या अंधारात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींसह एकूण नऊ जणांना अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले आहे विशेष म्हणजे यामध्ये एक विधिसंघर्षग्रस्त बालक व एका महिलेचा समावेश आहे .

          

भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत १४ फेब्रुवारी रोजी एक खानावळ चालकाच्या कार्यालयात घुसून आरोपींनी गावठी कट्ट्याचा धाक दाखवीत फिर्यादीवर चाकूने वार करून जखमी करीत त्यांच्या जवळील तीन मोबाईल चोरी केल्याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात जबरी दरोडयाचा गुन्हा दाखल केला असता,पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, नितीन पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कसीलास टोकले,पो उपनिरीक्षक निलेश जाधव,रवींद्र पाटील,कर्मचारी शेळके,चौधरी,इथापे,वेताळ,काकड,वडे,मोहिते,इंगळे, पाटील या पथकाने गुप्त बातमीदारा कडून मिळालेल्या माहिती आधारे कसून शोध घेत एकूण दरोड्याचा गुन्ह्यातील सहा आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून शांतीनगर येथील दोन व निजमपुरा येथील एक अशा तीन गुन्ह्यांची उकल केली आहे. 

 

विशेष म्हणजे या गुन्ह्यातील तीन आरोपी हे जिम ट्रेनर असून दिवसा युवकांना व्यायामाचे प्रशिक्षण देऊन रात्री घरफोड्या करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्या सोबत इतर पाच घरफोडीच्या गुन्ह्यां मध्ये अजून तीन जणांना ताब्यात घेतले त्यामध्ये एक विधिसंघर्षग्रस्त बालक ,एक महिला यांचा समावेश आहे, असे एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश मिळाले असून त्यांच्या जवळून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा ,चाकु, ९ हजार रुपयांचे दोन मोबाईल २ हजार रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा त्या सोबत विविध पाच घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करीत एक लाख २० हजार रुपयांचे ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम , १५ हजार रुपयांचे मोबाईल असा २ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत कारवाई केली आहे.

 

Web Title: Gym trainers during the day and robbers at night; burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.