...अन्यथा एका मिनिटात रिकामे होऊ शकते तुमचे बँक खाते; अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 09:54 AM2020-02-12T09:54:27+5:302020-02-12T10:05:53+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून सायबर फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

Hackers are withdrawing money from people's bank accounts through SIM swapping. | ...अन्यथा एका मिनिटात रिकामे होऊ शकते तुमचे बँक खाते; अशी घ्या काळजी

...अन्यथा एका मिनिटात रिकामे होऊ शकते तुमचे बँक खाते; अशी घ्या काळजी

Next

नवी दिल्ली: गेल्या अनेक वर्षांपासून सायबर फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वेगवेगळ्या पद्धतीने फसवणुक केली जाते, ज्याची लोकांना कल्पना देखील नसते. सायबर फसवणुकीमध्ये  सिम स्वॅपिंग हा प्रकार देखील जोडला गेला आहे. सिम स्वॅपिंगद्वारे हॅकर्स लोकांच्या बँकेच्या खात्यातून पैसे काढले जात असल्याचे समोर आले आहे.  सिम स्वॅपिंग करुन दिल्लीमधील एका उद्योगपतीच्या खात्यामधून 18 लाख रूपये काढण्यात आले असल्याचा प्रकार समोर आला आहे.

सिम स्वॅप म्हणजे सिम कार्डला बदलणे अथवा त्याच नंबरचे दुसरे सिम कार्ड घेणे. यामध्ये तुमच्या मोबाईल नंबरद्वारे आणखी एका सिमचे रजिस्ट्रेशन केले जाते. त्यानंतर तुमचे सिमकार्ड बंद होऊन, त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड चालू होते. याचा फायदा घेत तो मोबाईलवर ओटीपी नंबर मागवतो व तुमच्या खात्यातून पैसे काढून घेतो. 2018 मध्ये भारतात याद्वारे 200 करोड रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आधी सोशल मीडियाद्वारे तुमच्या लक्ष्य ठेऊन, माहिती गोळा केली जाते. अनेकवेळा अनोळखी नंबरवरून देखील तुम्हाला कॉल येतो व तुमची माहिती घेतली जाते.

अशी होते सिम स्वॅपिंगची सुरुवात:

सिम स्वॅपिंगद्वारे फसवणुक करणारे गुन्हेगार संबंधित सिम कार्ड कंपनीतून बोलत असल्याचा दावा करतात. त्यानंतर ते सिम कार्डच्या मागे असलेला 20 अंकाचा नंबर विचारतात. हा नंबर सांगितल्यानंतर  ते 1 अंक दाबायला सांगतात. 1 अंक दाबताच नवीन सिम कार्डचे ऑथेंटिकेशन येते व तुमचे नेटवर्क गायब होते. नेटवर्क गेल्यानंतर फसवणुक करणाऱ्या गुन्हेगाराच्या मोबाईलमध्ये नेटवर्क येते. गुन्हेगार बनावटी साईट्सद्वारे संपुर्ण माहिती गोळा करतात. गुगलवर तुम्ही इंटरनेट बँकिंग सर्च केल्यानंतर कोणत्याही बनावटी साईट्सवर तुमची माहिती दिली असेल तेथून हे तुमची माहिती जमा करतात. त्यामुळे त्यांच्याकडे इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड आणि आयडी आधीच असतात. व्यवहार करण्यासाठी त्यांना ओटीपीची गरज असते व सिम स्वॅपिंगद्वारे ते व्यवहार पुर्ण करतात. त्यामुळे बँकिंग व्यवहार हे बँकेच्या अधिकृत वेबसाईट्सद्वारेच करावे.

अशी घ्या काळजी:

तुम्हाला सिम कार्ड बदलायचे असल्यास किंवा दुसरे सिम कार्ड घ्यायचे असेल तर संबंधित कंपनीच्या दुकानात जाऊन योग्य ती प्रक्रियेची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. तसेच सिमचे नेटवर्क गेल्यास संबंधित कंपनीत दूसऱ्या मोबईलवरुन कंपनीच्या कस्टमर केअरला फोनकरुन माहिती द्या व पुढे काय करता येईल यासंबंधित विचारपूस करा. त्याचप्रमाणे तुम्ही काळजी घेतल्यानंतर देखील अशी घटना घडल्यास बँकेच्या कस्टमर केअरला फोनकरून सर्वात प्रथम डेबिट व क्रेडिट कार्ड बंद करा व बँकेकडे लेखी तक्रार दाखल करा.

Web Title: Hackers are withdrawing money from people's bank accounts through SIM swapping.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.