श्रद्धाचे तुकडे घरात आहेत, याची कल्पना नव्हती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 08:12 AM2022-12-01T08:12:19+5:302022-12-01T08:13:35+5:30
हत्येशी संबध नाही, आफताबच्या नव्या मैत्रिणीने केला दावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताबच्या नव्या मैत्रिणीने आपला श्रद्धाच्या हत्येशी किंवा त्याच्या तुकड्यांशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. ती जेव्हा आफताबच्या घरी भेटायला यायची, तेव्हा आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे याच घरात ठेवले होते याची कल्पना नव्हती, असे तिने सांगितले.
श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने या मुलीला डेट करणे सुरुवात केले. १२ ऑक्टोबरला आफताबने अंगठी दिल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. आफताब अमीन पूनावालाच्या पॉलिग्राफ चाचणीच्या अंतिम अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे.
सर्व भिस्त ब्रेन मॅपिंगवर?
ब्रेन मॅपिंग चाचणीमध्ये मेंदूतील संदेशांच्या देवाणघेवाणीवर लक्ष ठेवले जाते. ब्रेन मॅपिंग चाचणीमध्ये मेंदूतील हजारो न्यूरॉन्सच्या लहरींचे परीक्षण केले जाते. याद्वारे व्यक्तीची मानसिक स्थिती तपासली जाते. त्यातून गुन्हेगाराची रहस्ये उलगडली जातात. यासाठी आरोपीवर प्रश्नांचा भडिमार केला जातो. आता आफताबच्या नार्को चाचणीत पोलिसांच्या हाती काही लागले नाही तर ब्रेन मॅपिंगवर भिस्त असणार आहे.