बार्शीटाकळीत अर्धा किलो गांजाचा साठा हस्तगत, राहत्या घरातून सुरु होता धंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 08:30 PM2022-09-16T20:30:29+5:302022-09-16T20:32:01+5:30
अंमली पदार्थ गांजाची अवैधरीत्या विक्री करीत असल्याची माहीती पाेलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमूख विलास पाटील यांना मीळाली.
सचिन राऊत
अकाेला : बार्शीटाकळी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील सादीक नगर येथे एका घरातून प्रतिबंधीत असलेल्या गांजाची अवैधरीत्या विक्री सुरु असल्याच्या माहितीवरुन पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला. या घरातून एकास ताब्यात घेउन त्याच्याकडून ५०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
बार्शी-टाकळी येथील सादिक नगर परिसरातील रहीवासी शाहिद अली शाकीर अली हा त्याच्या राहत्या घरातून मादक अंमली पदार्थ गांजाची अवैधरीत्या विक्री करीत असल्याची माहीती पाेलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमूख विलास पाटील यांना मीळाली. या माहीतीवरुन त्यांनी पथकासह पाळत ठेउन आरोपी शाहिद अली शाकीर अली वय ३० वर्ष यास ताब्यात घेउन त्याच्या घरातून गांजा जप्त केला़ आरोपीविरुद्ध बार्शीटाकळी पाेलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही कारवाइ पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांच्या विशेष पथकाने केली.