हनिमुनच्यावेळी पत्नीचे काढलेले अर्धनग्न फोटो केले व्हायरल ; पती विरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 20:24 IST2021-01-07T20:18:52+5:302021-01-07T20:24:33+5:30
फेसबुकवर फोटो अपलोड करत त्या फोटोखाली ओपन रिलेशनशिप असे लिहिले..

हनिमुनच्यावेळी पत्नीचे काढलेले अर्धनग्न फोटो केले व्हायरल ; पती विरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी : लग्नानंतरचा पती पत्नीच्या आयुष्यातील नाजूक प्रसंग म्हणून हनिमूनची ओळख आहे. हा नाजूक क्षण प्रत्येक जण मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवतो. पण पिंपळे सौदागर येथे एका पतीने पत्नीसोबत घालवलेले ते हळवे क्षण सोशल मीडियावर अपलोड करत नात्यांला सुरुंग लावण्याचे काम केले.
हनिमुनच्या वेळी पत्नीचे काढलेले अर्धनग्न फोटो पतीने सोशल मीडियावर व्हायरल केले. याप्रकरणी ३७ वर्षीय पतीच्या विरोधात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पिंपळे साैदागर येथे हा प्रकार घडला.
याबाबत पत्नीने बुधवारी (दि. ६) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी हनिमुनच्या वेळी अर्धनग्न फोटो काढले होते. ते फोटो पतीने पत्नीची संमती न घेता फेसबुकवर अपलोड केले. तसेच त्या फोटोखाली ओपन रिलेशनशिप असे लिहून फिर्यादीच्या मनास लज्जा निर्माण करून तिचा विनयभंग केला. संबंधित फेसबुक अकाउंटचा पासवर्ड पतीला माहिती होता. तो पासवर्ड पतीने बदलला.