वरळीत खळबळ! नोकरी घालवल्याच्या रागातून सिक्युरिटी गार्डच्या डोक्यात घातला हातोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 09:30 PM2021-02-01T21:30:19+5:302021-02-01T21:30:50+5:30
Murder : ५० वर्षीय व्यक्ती मुंबईतील वरळी परिसरातील एका कन्स्ट्रक्शन साइटवर सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होती. शनिवारी ही व्यक्ती कामावर असताना त्याच्या पूर्व सहकाऱ्यांने त्याच्या डोक्यात हातोडा घातला.
वरळी परिसरात हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एका ५० वर्षांच्या व्यक्तीची डोक्यात हातोड्याने अनेक वार करत हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्ती एका कन्स्ट्रक्शन साइटवर एक सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होती. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असून पोलिसांनी आरोपी असलेल्या पूर्व सहकाऱ्याला अटक केली आहे. या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
५० वर्षीय व्यक्ती मुंबईतील वरळी परिसरातील एका कन्स्ट्रक्शन साइटवर सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होती. शनिवारी ही व्यक्ती कामावर असताना त्याच्या पूर्व सहकाऱ्यांने त्याच्या डोक्यात हातोडा घातला. पीडित व्यक्तीला काही कळायच्या आत आरोपीने त्याच्या डोक्यावर हातोड्याने जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यूमुखी पडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. वरळी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने आपला गुन्हा कबुल केला असून त्याच्यावर पुढील कारवाई केली जात आहे. मात्र या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर झालेल्या अपघात चौघांचा मृत्यू
मृतदेह ठेवले होते पलंगात लपवून; छत्तीसगडचे माजी मंत्री डी. पी. घृतलहरे यांच्या सुनेसह नातीची हत्या
वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आरोपी व्यक्ती आणि मृत व्यक्ती यांच्यात काही कारणांमुळे वाद झाला होता. त्यानंतर मृत व्यक्तीने आरोपी व्यक्तीची नोकरी घालवली होती. याचा राग मनात ठेवून त्याने आपल्या दोन अन्य साथीदारांच्या मदतीने संबंधित सिक्युरिटी गार्डच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर शनिवारी मारेकऱ्यांनी कन्स्ट्रक्शन साइटवर जावून संबंधित सिक्युरिटी गार्डवर हल्ला केला. आरोपींनी सिक्युरिटी गार्डच्या डोक्यात हातोड्याने प्रहार केला. अचानक झालेल्या हल्ल्यात ही व्यक्ती नीचपत खाली पडली,नंतर त्याच्या डोक्यात हातोड्याने अनेक वार करण्यात आले. ज्यामध्ये सिक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू झाला आहे.